शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

-तर नागपुरात लागल्या असत्या तीन ईव्हीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:54 IST

नागपूर लोकसभा मतदार संघातून शेवटच्या दिवशी दोघांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, अन्यथा एकाच वेळी तीन ईव्हीएम मशीन वापरण्याची वेळ नागपूर लोकसभा मतदार संघात आली असती.

ठळक मुद्देशेवटच्या दिवशी दोघांनी घेतला अर्ज मागे : एका ईव्हीएमवर १६ उमेदवारांची नावे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर लोकसभा मतदार संघातून शेवटच्या दिवशी दोघांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, अन्यथा एकाच वेळी तीन ईव्हीएम मशीन वापरण्याची वेळ नागपूर लोकसभा मतदार संघात आली असती.मतदानासाठी बॅलेट पेपर जाऊन आता ईव्हीएम मशीन आल्या आहेत. एका ईव्हीएम मशीनवर केवळ १५ उमेदवार आणि नोटा असे एकूण १६ उमेदवारांचीच नावे अंकित राहू शकतात. त्यामुळे एका मतदार संघात १६ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असल्यास दोन ईव्हीएम मशीन वापरावी लागेल. नागपूर लोकसभा मतदार संघासाठी तब्बल ३९ जणांनी अर्ज सादर केले होते. छाननीमध्ये ६ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. त्यामुळे ही संख्या ३३ वर आली; नंतर एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने ही संख्या ३२ झाली. गुरुवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. आज कुणीही अर्ज मागे घेतला नसता तर तीन ईव्हीएम मशीन वापरण्याची वेळ आली असती. परंतु तसे झाले नाही. शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांनी नावे मागे घेतली आणि निवडणुकीच्या रिंगणात एकूण ३० उमेदावर शिल्लक राहिले. त्यामुळे आता दोन ईव्हीएम मशीन वापरावी लागणार आहे.रामटेकमध्ये ‘नोटा’साठी लागणार स्वतंत्र ईव्हीएमरामटेक लोकसभा मतदार संघातून एकूण २४ जणांनी अर्ज सादर केले. छाननीमध्ये ३ अर्ज रद्द झाले, नंतर एकाने अर्ज मागे घेतला तर शेवटच्या दिवशी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता केवळ १६ उमेदवार रिंगणात आहेत. एका ईव्हीएमवर १६ उमेदवारांची नावे येऊ शकतात. यात १५ उमेदवार आणि १ नोटा आहे. तेव्हा एका ईव्हीएमवर सर्व १६ उमेदवारांची नावे घेण्यात येतील. तसेच नोटासाठी स्वतंत्र ईव्हीएम मशीन वापरली जाईल, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpurनागपूर