शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

...तर कंत्राटदाराला दिवसाला पाच हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:27 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम कधी पूर्ण होणार असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. मागील काही काळापासून बांधकामाने वेग घेतला असल्याचे दावे करण्यात येत असले तरी प्रशासनाने कंत्राटदाराला १३ डिसेंबर अगोदर हे काम पूर्ण करण्याचे ‘टार्गेट’ दिले आहे. जर वेळेत काम पूर्ण झाले नाही तर कंत्राटदाराला दिवसाला पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचे ‘टार्गेट’ १३ डिसेंबर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम कधी पूर्ण होणार असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. मागील काही काळापासून बांधकामाने वेग घेतला असल्याचे दावे करण्यात येत असले तरी प्रशासनाने कंत्राटदाराला १३ डिसेंबर अगोदर हे काम पूर्ण करण्याचे ‘टार्गेट’ दिले आहे. जर वेळेत काम पूर्ण झाले नाही तर कंत्राटदाराला दिवसाला पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले आहे.‘कॅम्पस’जवळील ४४ एकर मोकळ्या जागेवर नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी बजाज समूहातर्फे ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) अंतर्गत १५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २६ सप्टेंबर २०१५ रोजी याचे भूमिपूजन पार पडले. यावेळी राहुल बजाज यांनी हे काम दोन वर्षांत पूर्ण व्हायला हवे व १ आॅक्टोबरपासून याचे ‘काऊंटडाऊन’ सुरू होईल असे प्रतिपादन केले होते. तर ही ‘स्मार्ट’ व ‘ग्रीन’ इमारत पेपरलेस असेल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती.या समारंभानंतर वर्षभर तर येथे काहीच काम झाले नाही. विद्यापीठाने विविध प्रशासकीय अडचणी दूर करुन निविदी प्रक्रिया राबविली होती. यात ३ निविदा आल्या होत्या व सर्व निकष पूर्ण करणाऱ्या नागपूरातील एका कंपनीला कंत्राट देण्याचा निर्णय झाला. कंत्राटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरदेखील काम सुरू झाले नव्हते.२०१६ या वर्षाच्या अखेरीस महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यावेळी २०१८ चे ‘टार्गेट’ प्रशासनाने ठेवले होते. सद्यस्थितीत या इमारतीचा ढाचा उभा झाला आहे व ‘टाईल्स’ वगैरेदेखील लावण्याचे काम सुरु आहे. विद्युत, ‘प्लंबिंग’ तसेच रंगरंगोटीचे काम १३ डिसेंबरपर्यंत पूर्ण झाले पाहिजे, असे आम्ही कंत्राटदाराला सांगितले असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली.कुलगुरू निवासस्थानाशी थेट जोडली जाणार इमारतनवीन प्रशासकीय इमारत ही कुलगुरू निवासस्थानाच्या अगदी जवळ आहे. या इमारतीपासून ते कुलगुरू निवासस्थानापर्यंत सिमेंटचा अंतर्गत मार्ग बनविण्यात येईल. त्यामुळे कुलगुरूंना थेट पायीदेखील कार्यालयात येता येणार आहे, असे डॉ.काणे यांनी सांगितले.बजाज यांची मुदत केव्हाच संपली१० सप्टेंबर २०१६ पासून या इमारतीच्या बांधकामाचे ‘काऊंटडाऊन’ प्रशासनाने सुरू केले. प्रत्यक्षात २०१५ सालच्या १ आॅक्टोबरपासूनच याचे ‘काऊंटडाऊन’ सुरू होणार होते. तसे कुलगुरूंनी जाहीरपणे सांगितले होते. परंतु प्रशासकीय उदासीनता व विविध अडथळे यांच्यामुळे हे काम वर्षभर उशिराने सुरू झाले होते. दरम्यान या इमारतीच्या कोनशीला समारंभाला जवळपास तीन वर्ष होत आहेत. बजाज यांनी २ वर्षांत इमारत पूर्ण करण्यात यावी, असे सांगितले होते. मात्र त्यांची मुदत कधीच संपली आहे.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर