शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तर भारतीय अर्थव्यवस्थेला होईल ३० टक्के लाभ ; हेमंत चौधरींचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 01:06 IST

प्लास्टिकच्या समस्येसह जलप्रदुषण व वायुप्रदुषणाची गंभीर समस्या देशात आहे. त्यावर केंद्र आणि विविध राज्यातील शासनाद्वारे राबविणाऱ्या योजनांवर कोट्यवधीचा खर्च केला जातो. मात्र हा मोठा आजार झाल्यानंतर उपचार करण्यासारखा प्रकार असून त्याने समस्या सुटण्याची शक्यता नाही. त्यासाठी आजार होउच नये म्हणून प्रतिबंध घालणे हा उपाय करणे गरजेचे आहे. घनकचरा व्यवस्थापन व प्रदुषणाची समस्या सोडविण्यासाठी ‘उत्पादन-वापर-पुनर्वापर-रिसायकल’ ही वतुळाकार अर्थव्यवस्था स्वीकारावी लागेल. याद्वारे प्रदुषणाची समस्या सुटेलच, व्यवस्थापनाचा खर्च वाचेल व देशाच्या अर्थव्यवस्थेत ३० टक्के भर पडेल, असा विश्वास ऑस्ट्रेलिया अनिवासी भारतीय हेमंत चौधरी यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देभारतात घनकचरा व्यवस्थापनासाठी समन्वयाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्लास्टिकच्या समस्येसह जलप्रदुषण व वायुप्रदुषणाची गंभीर समस्या देशात आहे. त्यावर केंद्र आणि विविध राज्यातील शासनाद्वारे राबविणाऱ्या योजनांवर कोट्यवधीचा खर्च केला जातो. मात्र हा मोठा आजार झाल्यानंतर उपचार करण्यासारखा प्रकार असून त्याने समस्या सुटण्याची शक्यता नाही. त्यासाठी आजार होउच नये म्हणून प्रतिबंध घालणे हा उपाय करणे गरजेचे आहे. घनकचरा व्यवस्थापन व प्रदुषणाची समस्या सोडविण्यासाठी ‘उत्पादन-वापर-पुनर्वापर-रिसायकल’ ही वतुळाकार अर्थव्यवस्था स्वीकारावी लागेल. याद्वारे प्रदुषणाची समस्या सुटेलच, व्यवस्थापनाचा खर्च वाचेल व देशाच्या अर्थव्यवस्थेत ३० टक्के भर पडेल, असा विश्वास ऑस्ट्रेलिया अनिवासी भारतीय हेमंत चौधरी यांनी व्यक्त केला.हेमंत चौधरी मूळचे नागपूरचे रहिवासी असून गुरुवारी वनराई फाउंडेशनच्यावतीने आयोजित व्याख्यानात त्यांनी ‘सर्क्युलर इकानॉमी इन इंडिया’ या विषयावर मार्गदर्शन केले. दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडिलेडजवळील परिसरात त्यांच्या संस्थेद्वारे राबविलेल्या प्रकल्पाबाबत त्यांनी प्रोजेक्टरवर सविस्तर माहिती दिली. वर्तमानात हिरवागार दिसणारा हा प्रदेश जगातील मोठा वाळवंटीय प्रदेश म्हणून ओळखला जातो. पाण्याचे दुर्भिक्ष, भूमीप्रदुषणासारख्या समस्या येथेही भीषण होत्या. परिसरातून वाहणाऱ्या मुरे डार्लिंग नदीचे प्रदुषित पाणी वापरणेही शक्य नव्हते. मात्र येथील धोरण निर्माते, प्रशासनिक संस्था, कायदे अमलात आणणारे, तंत्रज्ञान पुरवठादार, उद्योजक, निवेशक, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या एकत्रित समन्वयाने योजना आखली. त्यातून जलसंचयानाचे, नियमन, घनकचरा व्यवस्थापन, रिसायकल युनिटचे अनेक प्रकल्प राबविले. पाण्याचा कमीतकमी वापर करून सौर उर्जेवर शेती सुरू केली. आज हा प्रदेश निवासाच्या दृष्टीने सर्वात सुंदर प्रदेश म्हणून नावाजला जात असल्याचे त्यांनी सांगितले.भारतात अनेक समस्या असल्या तरी हे आव्हान पूर्ण करणे कठीण नसल्याचे ते म्हणाले. त्यासाठी प्रत्येकाची मानसिकता निर्माण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. मात्र प्रशासनिक संस्था, सरकार व लोक गंभीरतेने तसे करीत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. २०१२ साली गुजरातच्या अहमदाबाद येथे असा प्रकल्प राबविण्याची योजना आखण्यात आली. मात्र कागदी घोडे चालविण्यापुढे काहीच न झाल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ तंत्रज्ञानाने ते शक्य नाही. भारतातील व इतर देशातील कचऱ्यात फरक आहे. त्याचा अभ्यास करून तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकार, प्रशासन, एनजीओ व लोकांनी एकत्रित काम करण्याची मानसिकता तयार होणे आवश्यक असल्याचे मत चौधरी यांनी व्यक्त केले. यावेळी गिरीश गांधी, गोपाळराव ठोसर, शशिकांत चौधरी, ज्युतिका चौधरी आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Vanraiवनराईnagpurनागपूर