शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

- तर भाजपाचा राजीनामा देणार ; आमदार विकास कुंभारे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 22:56 IST

आदिवासी हलबा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी भाजपाच्या आमदारकीचा राजीनामा देईल, असा इशारा आमदार विकास कुंभारे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देफडणवीस सरकारवर टीकास्त्र

ऑनलाइन लोकमतनागपूर : आदिवासी हलबा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी भाजपाच्या आमदारकीचा राजीनामा देईल, असा इशारा आमदार विकास कुंभारे यांनी दिला आहे. सोमवारी आयोजित एका पत्रपरिषदेत त्यांनी भाजपा आणि राज्यातील फडणवीस सरकारवर हल्ला चढवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाजाला दिलेले आश्वासन पाळले नाही असा आरोप केला. आम्ही आरपारच्या लढाईसाठी तयार असून हा समाज भाजपाला आपली ताकद दाखवून देईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. विशेष म्हणजे यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि भाजपाचे पाच नगरसेवकही उपस्थित होते.राष्टÑीय आदिम कृती समितीअंतर्गत झालेल्या पत्रपरिषदेत कुंभारे म्हणाले, आदिवासी हलबा समाजावर वर्षानुवर्षे झालेला अन्याय दूर होईल या अपेक्षेतून २०१४ च्या निवडणुकीत या समाजाने मोठ्या प्रमाणात भाजपाला मते दिली व भाजपा उमेदवारांना निवडून आणले. माझाही त्यात समावेश आहे. मात्र राज्यात आणि केंद्रात असलेल्या भाजपाने या समाजाला दिलेले एकही आश्वासन पाळले नाही व एकही समस्या सोडविली नाही. विशेष म्हणजे काँग्रेसच्या शासनकाळात समाजातर्फे झालेल्या बहुतेक आंदोलनाचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांनी केले आहे. मात्र सत्तेवर आल्यानंतर हेच नेते हलबा समाजाच्या मागण्या विसरले आहेत असा आरोप कुंभारे यांनी केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात विकास कुंभारे यांच्या नेतृत्वातील प्रतिनिधी मंडळाशी चर्चा करताना समस्या सोडविण्याचे आश्वासन देत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. मात्र आजवर एकाही निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याची टीका त्यांनी केली. अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देण्याचे राज्य शासनाचे आजवर धोरण राहिले असून शासनातर्फे याबाबत परिपत्रके निर्गमित केली आहेत. उच्च व सर्वोच्च न्यायालयानेही शासनाचे धोरण योग्य ठरविले आहे. मात्र हे राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाऊन हे परिपत्रक रद्द करण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोप त्यांनी केला. साडेतीन वर्षात एकाही वचनाची पूर्ती न करणाऱ्या भाजपा सरकारने आदिवासी हलबा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा घणाघाती आरोप करीत यामुळे अन्यायग्रस्त जमातींमध्ये भाजपा शासनाविरोधात प्रचंड असंतोष असल्याचे त्यांनी सांगितले. उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनीही यावेळी केंद्र व राज्यातील भाजपा सरकारवर हल्ला चढविला. सरकारने गेल्या साडेतीन वर्षात समाजाची समस्या सोडविली नाही, मात्र समाज आता ही दिरंगाई खपवून घेणार नाही असेही ते म्हणाले.पत्रपरिषदेला भाजपाचे नगरसेवक प्रवीण भिसीकर, यशश्री नंदनवार, राजेश घोडपागे, राजेंद्र सोनकुसरे, ज्योती डेकाटे-भिसीकर, काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर यांच्यासह समितीचे विश्वनाथ आसई, अ‍ॅड. नंदा पराते, प्रकाश निमजे, धनंजय धार्मिक, दे.बा. नांदकर, ओमप्रकाश पाठराबे, मनोहर घोराडकर, धनंजय धापोडकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदार