शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

तर निवडणुकीत सरकारचे नाक दाबू : गोवारी समाजाचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:05 IST

११४ शहीद गोवारी बांधवांच्या बलिदानाची दखल न्यायालयाने २४ वर्षानंतर घेतली. त्यामुळे वर्षानुवर्षे हक्कापासून वंचित राहणाऱ्या गोवारी समाजाला न्यायाची आस लागली. गोवारीवर झालेल्या अन्यायाला विराम मिळण्यासाठी फक्त एक पाऊल बाकी आहे. आता फक्त सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारींना अनुसूचित जातीत समावेश करण्यासंदर्भात अध्यादेश काढायचा आहे. ९० दिवस न्यायालयाचा निर्णय होऊन झाले आहे. मात्र सरकारच्या हालचाली मंदावल्या आहेत. मुंबईत सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गोवारींच्या संदर्भात निर्णय न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीत गोवारी समाज सरकारचे नाक दाबल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा गोवारी समाजाने श्रद्धांजली सभेत दिला.

ठळक मुद्देश्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लाखो गोवारी बांधव स्मारकावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ११४ शहीद गोवारी बांधवांच्या बलिदानाची दखल न्यायालयाने २४ वर्षानंतर घेतली. त्यामुळे वर्षानुवर्षे हक्कापासून वंचित राहणाऱ्या गोवारी समाजाला न्यायाची आस लागली. गोवारीवर झालेल्या अन्यायाला विराम मिळण्यासाठी फक्त एक पाऊल बाकी आहे. आता फक्त सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारींना अनुसूचित जातीत समावेश करण्यासंदर्भात अध्यादेश काढायचा आहे. ९० दिवस न्यायालयाचा निर्णय होऊन झाले आहे. मात्र सरकारच्या हालचाली मंदावल्या आहेत. मुंबईत सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गोवारींच्या संदर्भात निर्णय न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीत गोवारी समाज सरकारचे नाक दाबल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा गोवारी समाजाने श्रद्धांजली सभेत दिला. 

आदिवासी गोवारी समाज संघटना व श्रद्धांजली सभेचे आयोजक कैलास राऊत यांच्या अध्यक्षतेत श्रद्धांजली सभा घेण्यात आली. या सभेला आमदार डॉ. परिणय फुके, झेड. आर. दुधकवर, शालिक नेवारे, महिला व बालकल्याण सभापती पुष्पा वाघाडे, हेमराज नेवारे, सुरेंद्र राऊत, दामोदर नेवारे, प्रभू काळसर्पे, संजय हांडे, विलास यसनसुरे, बबलू राऊत आदी उपस्थित होते. 
२४ एप्रिल १९८४ चा जी.आर. रद्द करून ‘गोंडगोवारी’ यात कॉमा द्यावा, या मागणीसाठी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी गोवारी समाजाचा भव्य मोर्चा विधानभवनावर धडकला होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मोर्चाला भेट द्यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांची होती. मोर्चा त्यासाठी अडून बसला होता. मोर्चेकऱ्यांचा संताप वाढत होता, अशात पोलिसांकडून लाठीमार सुरू झाला. हवेत फायरिंग झाले. या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधव शहीद झाले. या घटनेनंतर शासनाने गोवारी समाजाला एसबीसीमध्ये २ टक्के आरक्षण दिले पण त्यातही ३९ उच्च जातींचा 
समावेश केल्याने गोवारींना त्याचा फायदा झाला नाही. शासनाने शहीद गोवारी बांधवांच्या स्मृतीत झिरो माईल चौकात गोवारी शहीद स्मारक उभारले. दरवर्षी २३ नोव्हेंबरला विदर्भासह राज्यातील विविध भागातून गोवारी बांधव स्मारकावर येतात. चेंगराचेंगरीत शहीद झालेल्या आपल्या आप्तेष्टांना साश्रुनयनाने श्रद्धांजली अर्पण करतात आणि या घटनेच्या आठवणी मनात साठवून आपापल्या गावी परत जातात.तर खरी श्रद्धांजली ठरेल 
न्यायालयाचा निकालानंतर गोवारी समाजाची अपेक्षा वाढली आहे. त्यामुळे यावर्षी मोठ्या संख्येने गोवारी बांधव स्मारकावर आले होते. श्रद्धांजली कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार, काहीतरी घोषणा करणार अशी अपेक्षा गोवारी बांधवांना होती. अख्खा समाज स्मारक परिसरात एकवटला होता. पण काही कारणास्तव मुख्यमंत्री येऊ शकले नाही. मुख्यमंत्र्यांनी समाजबांधवांच्या अपेक्षा लक्षात घेता, लवकरात लवकर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास शहीद गोवारींना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत यांनी व्यक्त केली.५० हजारावर गोवारी बांधवांनी दिली श्रद्धांजली 
२३ नोव्हेंबर हा दिवस गोवारी बांधव काळा दिवस म्हणून पाळतात. विदर्भातील कानाकोपऱ्यातून दुर्गम भागातून गोवारी बांधव नागपुरातील शहीद स्मारकावर पोहचतात. यावर्षी ५० हजारावर गोवारी बांधव स्मारकावर जमले होते. घटनास्थळी बांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली. अतिशय शांततेत साश्रुनयनाने शहिदांना नमन केले. घटनेच्या आठवणी ताज्या झाल्याने अनेकांचे डोळे पाणावले. पण समाज मौन होता. न्यायाच्या प्रतीक्षेत सरकारपुढे आपल्या भावना व्यक्त करून शांततेत आपापल्या गावी परतला.गडकरींसह मान्यवरांकडून श्रद्धांजली 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्मारकस्थळी जाऊन ११४ शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, महापौर नंदा जिचकार, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधाकर कोहळे, गिरीश व्यास, डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख, संदीप जाधव, किशोर पलांदूरकर, भोजराज डुंबे, गुड्डू त्रिवेदी, हाजी अब्दुल कादिर, अर्चना डेहणकर, रमेश वानखेडे, चंदन गोस्वामी यांच्यासह काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.

टॅग्स :nagpurनागपूर