नागपूर जिल्ह्यातील ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लसीकरण करण्यासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करणे गरजेचे आहे. एका आरोग्य केंद्रामध्ये एका सेविकेकडे लसीकरणाची संपूर्ण मोहीम दिली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना साहाय्य होण्यासाठी आशा वर्करची नियुक्ती करण्यात येते. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत आशा वर्कर्सदेखील कमी पडत असून, त्यांचीही पदे भरणे आवश्यक आहे. रिक्त पदांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून सफाई कामगारांपर्यंतचा समावेश आहे. अर्थसंकल्पनात आरोग्यावर मोठी तरतूद करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी राज्याच्या ग्राम विकास व सार्वजनिक आरोग्य विभागाकडे कास्ट्राईब जिल्हा परिषद संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी केली आहे.
..तरच होईल लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST