शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

...तर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल : शिक्षकांना तहसीलदाराचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 20:34 IST

संतप्त झालेल्या तहसीलदारांनी २४ तासात काम स्वीकारा अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल, असा धमकीवजा इशारा बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना दिला आहे.

ठळक मुद्देबीएलओचे काम करण्यास शिक्षकांचा नकार 

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम करण्याबाबत तहसीलदार हिंगणा यांच्याकडून शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्तीचे तिसऱ्यांदा आदेश देण्यात आले. मात्र कोणत्याही परिस्थितीत हे काम करणार नाही, असा निर्धार करून सर्व शिक्षकांनी काम नाकारले. त्यामुळे संतप्त झालेल्या तहसीलदारांनी २४ तासात काम स्वीकारा अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल, असा धमकीवजा इशारा बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना दिला आहे.१ जानेवारी २०१९ हा संदर्भ दिन पकडून मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जुलै महिन्यात सुरू करण्यात आला होता. त्याकरिता केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून तालुक्यातील दीडशेपेक्षा अधिक शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली होती. परंतु सदर काम अशैक्षणिक स्वरूपाचे असून त्यामुळे दैनंदिन अध्यापन कार्यात अडथळा निर्माण होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते, असे कारण देत सर्व शिक्षकांनी काम करण्यास स्पष्ट नकार दिला.दरम्यान, ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा ५६ शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आले. परंतु त्यावेळीसुद्धा शिक्षकांकडून हे काम नाकारण्यात आले. आता पुन्हा जवळपास दीडशेपेक्षा अधिक शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुन्हा एकदा सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन हे काम नाकारत असल्याबाबत तहसीलदार यांना लेखी स्वरूपात निवेदन सादर केले.परंतु २४ तासात काम स्वीकारा अन्यथा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा देणारे आदेश तहसीलदार हिंगणा यांच्याकडून २३ सप्टेंबर रोजी संबंधित शिक्षकांना देण्यात आले. आज नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीच्या नेतृत्वात सर्व शिक्षकांनी एकत्र येत सदर काम न करण्याचा निर्धार व्यक्त करीत, पुन्हा एकदा आपला नकार लेखी स्वरूपात तहसीलदार हिंगणा यांना कळविला आहे. न्यायालयाची सूचना आहे, शिक्षकांना सक्ती करू नयेप्रत्यक्ष निवडणुकीचे काम सोडले तर इतर निवडणूकविषयक कामे शिक्षकांना ऐच्छिक स्वरूपाची असून, शैक्षणिक सत्र सुरू असताना मतदार यादी नोंदणी अथवा मतदार यादी पुनर्निरीक्षणाची कामे शिक्षकांना देण्यात येऊ नये, अशी सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक सूचना आहे. त्यामुळे हे काम करण्याबाबत शिक्षकांना सक्ती करण्यात येऊ नये, अशी भूमिका नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीने घेतली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकagitationआंदोलनElectionनिवडणूक