शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

-तर बँकांमधून शासकीय खाते बंद करू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:40 IST

खरीप हंगामासाठी शेतकºयांना सुलभपणे कर्जपुवरठा करा, असे निर्देश प्रत्येक बँकेला देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही काही बँकांनी कर्जपुरवठा केलेला नाही. याची गंभीर दखल घेत अशा बँकांमधील शासकीय खाते गोठविण्याची शिफारस सरकारला केली जाईल, असा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

ठळक मुद्देपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांचा इशारा : पात्र शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगामासाठी शेतकºयांना सुलभपणे कर्जपुवरठा करा, असे निर्देश प्रत्येक बँकेला देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही काही बँकांनी कर्जपुरवठा केलेला नाही. याची गंभीर दखल घेत अशा बँकांमधील शासकीय खाते गोठविण्याची शिफारस सरकारला केली जाईल, असा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.बचत भवन येथे मंगळवारी खरीप पीक कर्ज आढावा तसेच कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकरी सभासदांना मिळालेल्या कर्जमाफीचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. यावेळी खा. कृपाल तुमाने, आ. आशिष देशमुख, डॉ. मिलिंद माने, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, मुख्य वनसंरक्षक मल्लिकार्जुन आदी उपस्थित होते.या वेळी पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, पीक कर्जासाठी बँकेत येणाºया प्रत्येक सभासदाला कर्ज प्रकरणासंदर्भात आवश्यक संपूर्ण माहिती देण्याची जबाबदारी बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची आहे. शासनाने कर्जमाफी दिल्यानंतर कर्जाचा बोजा कमी झाल्यामुळे त्यांना नवीन कर्ज देताना कुठलीही अडचण जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच तालुकास्तरावर उपविभागीय महसूल अधिकारी तसेच तहसीलदार यांनी सुरळीतपणे कर्जपुरवठा होईल यासाठी नियमित आढावा घ्यावा, अशा सूचना दिल्या. कर्ज पुरवठा करण्यासाठी बँकांमार्फत आवश्यक सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारींची पालकमंत्री बावनकुळे यांनी दखल घेतली. स्टेट बँक आॅफ इंडिया, युनियन बँक, आयसीआयसीआय तसेच पंजाब नॅशनल बँक या बँकांनी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अत्यल्प कर्जपुरवठा केला आहे. त्यामुळे सहकार विभागाचे प्रधान सचिव सर्व बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापकांसोबत बैठक घेऊन आढावा घेणार आहेत. अल्प कर्जपुरवठा बँकांसंदर्भात राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून, बँकांनी यापुढे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने दैनंदिन नियोजन करावे, असे निर्देशही बावनकुळे यांनी दिले.चार बँकांविरुद्ध कारवाई जिल्ह्यातील आयसीआयसीआय, एचडीएफसी, पीएनबी, युनियन बँक आदी बँकांचे कर्जमाफी तसेच कर्जवाटपासंदर्भातील कामकाज समाधानकारक नसल्याने संबंधित बँकांमध्ये असलेले शासकीय खाते बंद करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी दिल्या. इंडियन बँकेने ११ टक्के, पंजाब नॅशनल बँक १२ टक्के, स्टेट बँक आॅफ इंडिया १४ टक्के, सिंडीकेट बँक १७ टक्के, युको बँक १७ टक्के, युनियन बँक आॅफ इंडिया २०, अलाहाबाद बँक २० टक्के, बँक आॅफ इंडिया २० टक्के, सेंट्रल बँक आॅफ इंडिया १८ टक्के, कॉर्पोरेशन बँक १९ टक्के, इंडियन ओव्हरसिज बँक १९ टक्के तर विजया बँकेने २ टक्केच कर्ज दिले आहे. याचीही गंभीर दखल घेण्यात आली.

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक