शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

...तर एसीपी सुपारेंना करणार आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 21:22 IST

कांबळे दुहेरी हत्याकांडाचा तपास योग्यरीत्या न करणे किंवा आरोपींना मदत करून पीडितांना त्रास दिल्याप्रकरणी दोष सिद्ध झाला तर अ‍ॅट्रॉसिटी कायदा (कलम) ४ अंतर्गत तत्कालीन तपास अधिकार एसीपी किशोर सुपारे यांना आरोपी करण्यात येईल, अशी माहिती अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी.एल. थूल यांनी शनिवारी दिली.

ठळक मुद्देसी.एल.थूल : कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कांबळे दुहेरी हत्याकांडाचा तपास योग्यरीत्या न करणे किंवा आरोपींना मदत करून पीडितांना त्रास दिल्याप्रकरणी दोष सिद्ध झाला तर अ‍ॅट्रॉसिटी कायदा (कलम) ४ अंतर्गत तत्कालीन तपास अधिकार एसीपी किशोर सुपारे यांना आरोपी करण्यात येईल, अशी माहिती अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी.एल. थूल यांनी शनिवारी दिली.विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात शनिवारी थूल यांनी अनुसूचित जाती-जमातीशी संबंधित तक्रारींवर सुनावणी घेतली. यावेळी कांबळे दुहेरी हत्याकांडाचा आढावाही घेतला. यावेळी उपायुक्त नीलेश भरणे यांनी आयोगाला प्रकरणाशी संबंधित माहिती दिली. यावर आयोगाकडून नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. यानंतर थूल यांनी कांबळे कुटुंबीयांच्या घरी भेट दिली. त्यांच्याकडून माहिती घेतली, नंतर घटनास्थळांना भेट दिली. यावेळी उपायुक्त नीलेश भरणे उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, पीडित पत्रकार रविकांत कांबळे यांनी केलेली तक्रार मिळाली. तत्कालीन तपास अधिकारी एसीपी यांनी प्रकरण योग्यरीत्या हाताळले नाही, असे त्यात नमूद होते. पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून यासंदर्भातील खुलासा करण्यास सांगण्यात येणार आहे. पीडित, साक्षीदार, पोलीस अधिकाऱ्यांची पुन्हा सुनावणी घेण्यात येईल. सुपारेंनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असला तरी सर्वच पुरावे काही नष्ट होत नाही. सुनावणीत ते नव्याने समोर येतील. सुपारे यांचा दोष सिद्ध झाल्यास या प्रकरणात त्यांनाही आरोपी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. अ‍ॅट्रॉसिटीच्या कलम ४ नुसार आरोपी करून कलम २२ अंतर्गत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. एका चौकशी अधिकाऱ्याकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो, तर दुसऱ्या तपास अधिकाऱ्याकडून सर्व पुरावे गोळा करून न्याय देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणास आयोगाकडून गांभीर्याने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.असे आहे प्रकरणआजी उषा व नात साक्षी कांबळे यांची फेब्रुवारी महिन्यात गणेश शाहू आणि इतरांनी घरीच हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतांचे शरीर नाल्यात फेकले. आरोपीच्या पत्नीने घरातील रक्ताचे डाग स्वच्छ केले. या गुन्ह्यात अ‍ॅट्रॉसिटी लागल्याने तपास एसीपी सुपारे यांच्याकडे आला. मात्र त्यांनी प्रकरणाची योग्यरीत्या तपासणी केली नसून, आरोपींना मदत केल्याचा आरोप कांबळे कुटुंबीयांनी केला आहे.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर