शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील कचारीसावंगा येथील युनियन बँकेत चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:30 IST

चोरट्याने बँकेचे शटर वाकवून आत प्रवेश करीत कॅशियरच्या केबिनमधील ड्रॉवर हुडकले. मात्र, हाती केवळ १,५०० रुपये लागल्याने ती रक्कम घेऊन तो पळून गेला. ही घटना कोंढाळी (ता. काटोल) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कचारीसावंगा येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अवघ्या सात तासात अटक केली.

ठळक मुद्देसीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमुळे आरोपी अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चोरट्याने बँकेचे शटर वाकवून आत प्रवेश करीत कॅशियरच्या केबिनमधील ड्रॉवर हुडकले. मात्र, हाती केवळ १,५०० रुपये लागल्याने ती रक्कम घेऊन तो पळून गेला. ही घटना कोंढाळी (ता. काटोल) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कचारीसावंगा येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अवघ्या सात तासात अटक केली.भूषण बाबूराव सलाम (२३, रा. गणेशपूर, ता. काटोल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भूषणने सोमवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास कचारीसावंगा (ता. काटोल) येथील युनियन बँक आॅफ इंडियाच्या शाखेचे शटर वाकवून आत प्रवेश केला. तत्पूर्वी त्याने मध्यरात्री १२.२४ वाजताच्या सुमारास या भागाची पाहणीही केली होती. आत शिरल्यानंतर त्याने कॅशियरच्या केबिनमधील ड्रॉवर हुडकले. त्यातील १,५०० रुपये त्याच्या हाती लागले. त्यानंतर त्याने पळ काढला.पहाटे ५ वाजताच्या सुमारास सुरक्षा रक्षक भूषण शिंदे, रा. लाडेगाव, जिल्हा वर्धा यास बँकेत चोरी झाल्याचे आढळून आले. त्याने आरडाओरड करताच नागरिक गोळा झाले. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, बँक शाखा व्यवस्थापक सुरेश सोनकुसरे, काटोलचे ठाणेदार एस. एस. राजपूत, कोंढाळीचे उपनिरीक्षक पवन भांबूरकर व सहकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजची पाहणी करून सकाळी ७.३० वाजतापासून तपासाला सुरुवात केली. दरम्यान, आरोपी भूषणला सकाळी १० वाजताच्या सुमारास कचारीसावंगा परिसरातून ताब्यात घेत अटक केली.मोटरसायकल जप्तआरोपी भूषणने चोरी करण्यासाठी वापरलेली एमएच-४९/झेड-०८५३ क्रमांकाची मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली. तो कचारीसावंगा नजीकच्या गणेशपूर येथील राहणारा असून, पूर्वी म्हाडामध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करायचा. त्याला पाच महिन्यांपूर्वी कामावरून कमी करण्यात आल्याने तो सध्या बेरोजगार आहे. बँकेतील तिजोरीमध्ये आठ लाख रुपये होते. ती त्याला फोडता न आल्याने ही रक्कम बचावली.‘अलार्म’ वाजला नाहीया बँक शाखेत विविध ठिकाणी एकूण आठ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. पैकी आतील तीन व बाहेरील एक असे एकूण चार कॅमेरे त्याने फोडले व शेजारच्या शेतात फेकले. ते जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. बँकेत ‘सेक्यूरिटी अलार्म’ लावला आहे. बँक बंद करतेवेळी ‘नाईट मोड’ करण्याचे कर्मचारी विसरले. त्यामुळे चोरटा आत प्रवेश करतेवेळी ‘अलार्म’ वाजला नाही.

टॅग्स :bankबँकtheftचोरी