शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कळमन्यात लाखोच्या फळांची चोरी : नारे-निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 20:59 IST

कळमना फळे बाजारात यंदाच्या हंगामात फळे चोरीच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या घटनांवर प्रशासकाला नियंत्रण आणण्यात अपयश आले आहे. याचा निषेध म्हणून शनिवारी आडतिया आणि व्यापाºयांनी फळांचा लिलाव बंद पाडून बाजारात प्रशासनाविरोधात नारे-निदर्शने केली.

ठळक मुद्देआडतिया, व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडला, कळमन्यात अस्वच्छतेचा कळस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना फळे बाजारात यंदाच्या हंगामात फळे चोरीच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या घटनांवर प्रशासकाला नियंत्रण आणण्यात अपयश आले आहे. याचा निषेध म्हणून शनिवारी आडतिया आणि व्यापाºयांनी फळांचा लिलाव बंद पाडून बाजारात प्रशासनाविरोधात नारे-निदर्शने केली.प्राप्त माहितीनुसार, दरवर्षी फळे चोरीच्या घटना घडतातच, पण यंदा यात वाढ झाली आहे. या संदर्भात प्रशासक राजेश भुसारी आणि कळमना पोलिसांना माहिती दिली आहे. यावर नियंत्रण आणण्यात दोघांनाही अपयश आले आहे. याचा निषेध म्हणून शनिवारी नारे-निदर्शने करण्यात आली. त्यानंतरही फळे अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांच्या कार्यालयात प्रशासक राजेश भुसारी, कळमना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, आडतिये, व्यापारी आणि शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत चोरीच्या घटनांवर आळा घालण्याचे आश्वासन प्रशासक आणि पोलिसांनी दिले. त्यानंतरच लिलाव प्रक्रिया पार पडली.आनंद डोंगरे म्हणाले, एक टन मोसंबी ३० हजार रुपयांची होते. चिखली आणि लगतच्या भागातील असामाजिक तत्त्व व गुंड प्रवृत्तीचे लोक रात्री सुरक्षा रक्षक आणि शेतकऱ्यांना शस्त्रे दाखवून फळे चोरून नेतात. ते संख्येने जास्त असल्याने त्यांच्यावर आळा घालणे सुरक्षा रक्षकांनाही कठीण जाते. अशा घटनांची माहिती पोलिसांनाही दिली आहे. पण आतापर्यंत चोरटे सापडले नाहीत. तसे पाहिल्यास ५०० रुपयांचा कृषी माल सेस दिल्याविना कळमन्याच्या गेटबाहेर जात नाही. असे असताना चोरटे लाखोंचा माल चोरटे कसा घेऊन जातात, यावर प्रश्नचिन्ह आहे. प्रशासक आश्वासन देण्यापलीकडे काहीच करीत नाहीत. पाच वर्षांनंतर गेल्या महिन्यात कळमन्याच्या मुख्यदारातून ये-जा सुरू झाली आहे. चिखली गेटकडून चोरटे शस्त्राच्या जोरावर माल बाहेर नेतात. यात शेतकºयांचे जास्त नुकसान होते.बाजारात अस्वच्छताकळमन्यात संपूर्ण विदर्भासह नागपूर जिल्ह्याच्या तालुक्यातून मोसंबी आणि संत्र्याची आवक वाढली आहे. मोसंबीचे जवळपास २०० आणि संत्र्याचे ५० ते ६० टेम्पो दररोज येत आहेत. त्यामुळे खराब माल बाजारात पडून राहतो. त्याची उचल करण्यात येत नसल्याने बाजारात दुर्गंधी पसरली आहे. प्रशासकाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे फळे बाजारात अस्वच्छतेचा कळस झाल्याचे डोंगरे म्हणाले.बैठकीत १०० पेक्षा जास्त अडतिया, २५० व्यापारी आणि खरेदीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर