शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात माजी पोलीस आयुक्तांकडे चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 01:02 IST

येथील माजी पोलीस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या इमारतीतील मंदिरात चोरी झाल्याचे उघडकीस आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमंदिरातील सोन्याची मूर्ती, साहित्य लंपास : नोकरावर संशय

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : येथील माजी पोलीस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या इमारतीतील मंदिरात चोरी झाल्याचे उघडकीस आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.चक्रवर्ती धरमपेठेतील झेंडा चौकात राहतात. त्यांच्या इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या माळ्यावर दोन मंदिर आहेत. येथे पंडित नेहमी पूजा करण्यासाठी येतो. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी पंडित पूजा करायला आले. मंदिरातील सोन्याची गणपतीची मूर्ती व अन्य साहित्य तेथे नसल्याचे त्यांना दिसले. त्यांनी नोकरांकडे विचारणा केली, मात्र त्यांनी माहिती नाही, असे सांगितले. त्यानंतर पंडित यांनी चक्रवर्ती यांना माहिती दिली. चक्रवर्ती यांनी दोन्ही मंदिरातील साहित्य बघितले. मंदिरातील सोन्याच्या मूर्तीसह सोन्याचे नाणे, चांदीची पेटी व चांदीच्या पादुकाही चोरीला गेल्याचे स्पष्ट झाल्याने चक्रवर्ती यांनी सीताबर्डी पोलिसांना घटनेची माहिती दिली. लगेच सीताबर्डी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. त्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत चक्रवर्ती यांच्याकडे काम करणाऱ्या नोकराने चार दिवसांपूर्वीच काम सोडल्याचे पुढे आले. त्यामुळे त्यानेच ही चोरी केल्याचा संशय आहे. तो नोकर पश्चिम बंगालमधील रहिवासी आहे. सीताबर्डी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्या नोकराचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक पश्चिम बंगालला जाणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस