शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नागपुरात अभिनय कार्यशाळेसह रंगभूमी सप्ताहाला सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:47 IST

जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून राष्ट्रभाषा परिवार आणि मेराकी थिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने रंगभूमी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनयाच्या क्षेत्रात पहिल्यांदा रंगभूमीवर पाऊल ठेवणाऱ्या तरुणांसाठी मेराकी थिएटर्सच्या ‘फर्स्ट बेल ऑन स्टेज’ या उपक्रमांतर्गत अभिनय कार्यशाळेद्वारे बुधवारी रंगभूमी सप्ताहाला सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देमेराकी थिएटर व राष्ट्रभाषा परिवारचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून राष्ट्रभाषा परिवार आणि मेराकी थिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने रंगभूमी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनयाच्या क्षेत्रात पहिल्यांदा रंगभूमीवर पाऊल ठेवणाऱ्या तरुणांसाठी मेराकी थिएटर्सच्या ‘फर्स्ट बेल ऑन स्टेज’ या उपक्रमांतर्गत अभिनय कार्यशाळेद्वारे बुधवारी रंगभूमी सप्ताहाला सुरुवात करण्यात आली.राष्ट्रभाषा भवन, उत्तर अंबाझरी रोड, रामदासपेठ येथे रंगभूमीचा सप्ताह साजरा केला जात आहे. बुधवारी आयोजित अभिनय कार्यशाळेत तरूण नाट्यकर्मी रूपेश पवार आणि ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भिसीकर यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत शहरातील या क्षेत्रात पाऊल ठेवू इच्छिणाऱ्या १९ नवोदितांनी सहभाग घेतला. रूपेश पवार यांनी नाट्याभिनयाचे धडे नवोदितांना दिले. रंगभूमीचे महत्त्व, नाटकाचे महत्त्व, नाटकांचे विषय, रंगभूमीवरील वावर, वाचिक-शारिरिक अभिनय आदी विषयांवर विस्तृत असे मार्गदर्शन त्यांनी केले. नवोदितांना थिएटरचे स्वत:च्या भावनिक आनंदाशिवाय व्यावहारिक जीवनात असलेले महत्त्व, एक चांगला कलावंत घडण्याचा प्रवास त्यांना सांगणे, त्यांनी प्रामाणिकपणे कार्य करून अभिनयाचा तळ गाठावा आणि तांत्रिक गोष्टी जाणाव्या हा या कार्यशाळेचा उद्देश असल्याचे सांगत हे तरुण कलावंत उद्या नागपूरची रंगभूमी समृद्ध करतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.रंगभूमी दिन सप्ताहात गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता ‘ओपन माईक’ सत्रामध्ये ‘माय फर्स्ट नोट’ हा उपक्रम राबविला जाणार असून यात तरुण त्यांच्या पहिल्यावहिल्या कथा, कवितांचे वाचन करतील. २९ ते ३१ मार्च यादरम्यान दररोज सायंकाळी ६.३० वाजता ‘पिकनिक, रिहर्सल’, ‘दर्प, गुड और बेस्ट’ तसेच ‘श्री गणेशा’ व ‘पेशावर से लाहोर तक’ या सहा एकांकिका महोत्सवात सादर केल्या जाणार आहेत़ गुरुवारी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहायक संचालक अल्का तेलंग यांच्याहस्ते या एकांकिका महोत्सवाचे उद्घाटन होणार असल्याचे रूपेश पवार यांनी सांगितले.

टॅग्स :NatakनाटकTheatreनाटक