शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वासनेची शिकार ठरली बालिका व अल्पवयीन मुलगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 21:30 IST

Nagpur News नागपुरात एका बालिकेसह दोन अल्पवयीन मुलींना वासनेची शिकार केल्याच्या घटना घडल्या आहेत.

ठळक मुद्देदोन दिवसांत चार घटना

नागपूर : बालिकेसह दोन अल्पवयीन मुलींना वासनेची शिकार केल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही घटनांमधील पीडिता आई-वडिलांच्या नात्यात दुरावा असल्यामुळे आजी-आजोबांसोबत राहतात. दोन दिवसांत बलात्कार, तसेच छेडखानीच्या चार घटना घडल्या आहेत.

पहिल्या घटनेतील पीडिता सहा वर्षांची बालिका आपल्या आईसोबत आजीच्या घरी राहते. घरातील कूलर खराब असल्यामुळे तो दुरुस्त करण्यासाठी तिच्या आजीने वस्तीतील ६० वर्षांच्या देवदास वाघमारेला घरी बोलावले होते. मंगळवारी दुपारी देवदास बालिकेच्या आजीच्या घरी आला. त्यावेळी बालिका आणि तिचा मावसभाऊ हेच घरी होते. देवदास आल्यानंतर तिचा मावसभाऊ खेळण्यासाठी बाहेर गेला. बालिका घरी एकटीच होती. ते पाहून देवदासने कूलर दुरुस्त करण्याच्या बहाण्याने बालिकेशी जबरदस्ती केली. बालिकेने आरडाओरड केल्यामुळे तिचा मावसभाऊ घराकडे येत होता, ते पाहून देवदास पळून गेला. बालिकेने आपल्या आईला आपबिती सांगितली. तिच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी बलात्कार, तसेच पोक्सोचा गुन्हा दाखल करून देवदासला अटक केली.

दुसरी घटना हुडकेश्वरमध्ये घडली आहे. १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी आईवडील वेगळे झाल्यामुळे आजी-आजोबांसोबत राहते. सोमवारी रात्री तिला स्वयंपाक करण्यासाठी वेळ लागला. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला रागावले. संतप्त होऊन ती घरातून निघून गेली. ती रात्री १.४५ वाजता परिसरात भटकत होती. त्यावेळी २० वर्षांच्या एका युवकाने तिला धक्का दिला. तिने हिमतीने त्याला फटकारले. दरम्यान, युवकाने तिला पकडून तिच्याशी जबरदस्ती करीत होता. त्याचा मुकाबला करून ती रेल्वे स्थानकावर पोहोचली, तेथे पोलिसांची नजर तिच्यावर गेली. पोलिसांनी चौकशी केली असता, तिने घटनेची माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी हुडकेश्वर ठाण्यात याची माहिती दिली. दरम्यान, ती गायब असल्यामुळे तिचे कुटुंबीय हुडकेश्वर ठाण्यात पोहोचले होते. तिच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी छेडखानी, तसेच पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे.

...........

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी