शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारचे नाव गुन्ह्यात का नाही? अजित पवार यांच्या मुलाला पोलिस वाचवत आहेत का? मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ११ डिसेंबर २०२५: अचानक धनलाभाचा योग, प्रकृतीचा त्रास होणार
3
"६ महिन्यापासून पगार नाही, घर सांभाळणंही कठीण झालं..."; पाकिस्तानातील अधिकाऱ्याचा Video व्हायरल
4
लाडक्या बहिणींना ‘योग्यवेळी’ २१०० रुपये; विरोधकांकडून अदिती तटकरे यांची कोंडी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किल्ला लढविला
5
इंडिगोचे अध्यक्ष मेहतांचा अखेर माफीनामा; म्हणे... चूक झाली, मनापासून माफी मागतो!
6
लोकशाहीच्या पायावरच प्रहार? मतदारयादीची विश्वसनीयता हाच निवडणूक प्रक्रियेचा मूलाधार
7
इंडिगोवर नजर ठेवणार डीजीसीएची टीम; सीईओ पीटर एल्बर्सना हजर राहण्याचे आदेश
8
वैद्यकीय विश्वाच्या या विचित्र घुसमटीचं काय करावं?
9
महाराष्ट्र ‘गप’गार; पारा १० अंशांपर्यंत घसरला; कडाक्याची थंडी पडली
10
जमिनीच्या ‘सनद’ची अट रद्द; महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक
11
गोव्याच्या धर्तीवर वाहतूक पोलिसांकडे ‘बॉडी कॅमेरा’; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट : प्रमुख शहरांत टप्प्याटप्प्याने
12
सदस्य आहेत तर मंत्री नाहीत अन् मंत्री आहेत तर लेखी उत्तरच मिळत नाही!
13
खडसेंना काेर्टाचा दणका, भाेसरी भूखंड घाेटाळाप्रकरणी आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला
14
भाजप, शिंदेसेनेत प्रवेश केलेल्यांची धाकधूक वाढली; दोन किंवा जास्त तिकीटे हवे असलेले हवालदिल
15
ई-वाहनांना येत्या ८ दिवसांत टोलमाफी, भरलेला मिळणार; राहुल नार्वेकर यांनी दिले आदेश
16
वर्षभरात आठ हजार नवीन एसटी बसेस रस्त्यावर येणार; २०२९ पर्यंत बस डेपोंचा कायापालट करणार
17
दीपावली उत्सव युनेस्कोच्या वारसा यादीत; भारतासाठी अभिमानाची घटना; पंतप्रधान मोदींनी केले निर्णयाचे स्वागत
18
मुंबईत आतापर्यंत सापडले ४१,०५७ दुबार मतदार, दुबार नावांमध्ये होणार; १५ ते २० टक्केपर्यंत घट !
19
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
20
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या मनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; संविधानाचे धडे देणारे नागपूर देशातील पहिले विद्यापीठ ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:57 IST

Nagpur : चारही विद्याशाखा अंतर्गत येणाऱ्या जवळपास ३५० अभ्यासक्रमांत भारतीय संविधान या विषयाचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आता भारतीय संविधान शिकता येणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार २ क्रेडिटचा अभ्यासक्रम विद्यापीठाने तयार केला आहे. भारतीय संविधानाचा सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी अशा प्रकारचा अभ्यासक्रम तयार करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे देशातील पहिलेच विद्यापीठ ठरणार आहे.

भारताच्या संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असताना विद्यापीठात प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संविधान विषय सर्वच अभ्यासक्रमाकरिता लागू करण्यात आला आहे. विद्यापीठातील जवळपास ३ लाख विद्यार्थ्यांना आता भारतीय संविधानाचे धडे दिले जाणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव विज्ञान विद्याशाखा, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा या चारही विद्याशाखा अंतर्गत येणाऱ्या जवळपास ३५० अभ्यासक्रमांत भारतीय संविधान या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयाचे प्राचार्य व विधि अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविशंकर मोर यांनी ही संकल्पना तत्कालीन कुलगुरू दिवंगत डॉ. सुभाष चौधरी यांच्यापुढे मांडली होती. तेव्हापासून या दिशेने कार्य सुरू झाले. सर्वच अभ्यास मंडळांनी याला मंजुरी दिली. त्यानुसार पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात बदल करून बीए, बीकॉम, बीएस्सी आदी पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय सेमिस्टरमध्ये उन्हाळी २०२५ परीक्षेत हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच सर्व अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्यात आला असून, याची परीक्षादेखील होणार आहे. अशाप्रकारे व्हॅल्यू एडिशन (२ क्रेडिट) अभ्यासक्रम प्रत्येक पदवीत सुरू करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भारतातील एकमेव विद्यापीठ आहे.

तीन भाषांत पुस्तक उपलब्ध"भारतीय संविधान विषयाचा नेमका कोणता अभ्यास करावा, अशी चिंता विज्ञान, वाणिज्य, कला अशा अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना होत असल्याने संक्षिप्त, परंतु महत्त्वाचे असे ३० ते ४० पानांत समजणारे छोटे पुस्तक हिंदी, मराठी व इंग्रजी भाषेमध्ये विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरदेखील ते निःशुल्क उपलब्ध राहणार आहे."- डॉ. रविशंकर मोरे, प्राचार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, नागपूर.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूरEducationशिक्षण