शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
2
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
3
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
4
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
5
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
6
चीन भारतात घुसला; 56 इंची छातीचा देशाला काय उपयोग? खरगेंचा पीएम मोदींवर निशाणा
7
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
8
‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 
9
Puja Rituals: उदबत्तीची रक्षा, जळलेल्या वाती तुम्ही कचऱ्यात तर फेकून देत नाही ना? 
10
महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
11
गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
12
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
13
“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?
14
Kitchen Tips: गॅस सिलेंडरची नळी कधी बदलायची? स्फोट टाळण्यासाठी माहीत हवे 'हे' नियम!
15
Sydney Sweeney: सिडनी स्वीनीच्या हॉटनेसपुढं सगळंच फिकं, फोटो पाहून चाहते झाले घायाळ
16
सोनिया गांधी नागरिकत्व घेण्याआधीच कशा बनल्या मतदार? १९८० च्या मतदार यादीवरून कोर्टाने बजावली नोटिस
17
तगडा अभिनय तरीही 'धुरंधर'साठी अक्षय खन्नाला रणवीरपेक्षा खूपच कमी मानधन; मिळाले फक्त 'इतके' पैसे
18
"बच्चे बड़े हो जाते हैं, लेकिन…" IPL वर वसीम अक्रमची तिखट टिप्पणी; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
19
‘त्या’ दिवशी आधी जिल्हा, मग राज्य बंद करण्यात येईल; संतोष देशमुख प्रकरणी मनोज जरांगेंचा इशारा
20
प्रदूषणामुळे वाढतोय सायलेंट स्ट्रोकचा धोका? लक्षणं दिसताच व्हा अलर्ट, निष्काळजीपणा ठरेल घातक
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम

By आनंद डेकाटे | Updated: April 28, 2025 22:49 IST

भारतीय संविधानाचे धडे देणारे देशातील पहिले विद्यापीठ ठरणार

आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आता भारतीय संविधान शिकता येणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा नुसार २ क्रेडिटचा अभ्यासक्रम विद्यापीठाने तयार केला आहे. भारतीय संविधानाचा सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी अशा प्रकारचा अभ्यासक्रम तयार करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे देशातील पहिलेच विद्यापीठ ठरणार आहे.

भारताच्या संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असताना विद्यापीठात प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संविधान विषय सर्वच अभ्यासक्रमाकरिता लागू करण्यात आला आहे. विद्यापीठातील जवळपास ३ लाख विद्यार्थ्यांना आता भारतीय संविधानाचे धडे दिले जाणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव विज्ञान विद्याशाखा, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा या चार ही विद्याशाखा अंतर्गत येणाऱ्या जवळपास ३५० अभ्यासक्रमात भारतीय संविधान या विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य व विधी अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविशंकर मोर यांनी ही संकल्पना तत्कालीन कुलगुरू दिवंगत डॉ. सुभाष चौधरी यांच्यापुढे मांडली होती. तेव्हापासून या दिशेने कार्य सुरू झाले. सर्वच अभ्यास मंडळांनी याला मंजुरी दिली. त्यानुसार पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात बदल करून बीए, बीकॉम, बीएससी आदी पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय सेमिस्टर मध्ये उन्हाळी २०२५ परीक्षेत हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच सर्व अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्यात आला असून याची परीक्षा देखील होणार आहे. अशाप्रकारे व्हॅल्यू एडिशन (२ क्रेडिट) अभ्यासक्रम प्रत्येक पदवीत सुरू करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भारतातील एकमेव विद्यापीठ आहे.

तीन भाषेत पुस्तक उपलब्ध

भारतीय संविधान विषयाचा नेमका कोणता अभ्यास करावा, अशी चिंता विज्ञान, वाणिज्य, कला अशा अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना होत असल्याने संक्षिप्त परंतु महत्त्वाचे असे ३० ते ४० पानात समजणारे छोटे पुस्तक हिंदी, मराठी व इंग्रजी भाषेमध्ये विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देखील ते निःशुल्क उपलब्ध राहणार आहे.-डॉ. रविशंकर मोरे, प्राचार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिनnagpurनागपूर