शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

राज्याला सक्षम महिला मुख्यमंत्री हवी, ‘कठपुतली’ नको; विदर्भस्तरीय लोकमत ज्योत्स्ना सखी सन्मान पुरस्कारांचे थाटात वितरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2023 19:44 IST

Nagpur News जात व पितृसत्ताक व्यवस्थेतून बाहेर पडणाऱ्या महिला पुढे येणे आवश्यक आहे. हे मोठे राज्य स्वक्षमतेने सांभाळू शकेल, अशी सक्षम महिलाच मुख्यमंत्रीपदावर यायला हवी, कुणाच्या तरी इशाऱ्यांवर काम करणारी ‘कठपुतली’ नको, अशी परखड भूमिका प्रमुख महिला नेत्यांनी शनिवारी येथे ‘लोकमत’च्या मंचावर मांडली. 

नागपूर : पुरोगामी महाराष्ट्राला आजपर्यंत महिला मुख्यमंत्री लाभली नाही, हा चर्चेचा व चिंतेचा विषय नक्कीच आहे. मात्र केवळ महिला मुख्यमंत्री झाली म्हणजे महिलांचे सर्व प्रश्न सुटतील असे नाही. जात व पितृसत्ताक व्यवस्थेतून बाहेर पडणाऱ्या महिला पुढे येणे आवश्यक आहे. हे मोठे राज्य स्वक्षमतेने सांभाळू शकेल, अशी सक्षम महिलाच मुख्यमंत्रीपदावर यायला हवी, कुणाच्या तरी इशाऱ्यांवर काम करणारी ‘कठपुतली’ नको, अशी परखड भूमिका प्रमुख महिला नेत्यांनी शनिवारी येथे ‘लोकमत’च्या मंचावर मांडली. 

लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित विदर्भस्तरीय लोकमत ज्योत्स्ना सखी सन्मान पुरस्कारांचे वितरण ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे, नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुनिता गावंडे, ‘जीएसटी’च्या सहआयुक्त निधी चौधरी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. श्रुती तांबे, ज्वेलरी डिझायनर व ‘इन्ट्रिया’च्या संचालिका पूर्वा दर्डा-कोठारी यांच्या हस्ते थाटात पार पडले. 

समारंभाला जोडून 'महिला मुख्यमंत्र्यांसाठी महाराष्ट्राला आणखी किती प्रतीक्षा?' या विषयावरील परिचर्चेत राज्यातील चार प्रमुख पक्षांच्या ज्येष्ठ महिला नेत्यांनी मनमोकळेपणाने विचार मांडले. झाल्या. ‘बिमारू’ राज्य म्हणून गणना होणाऱ्या उत्तरप्रदेश, बिहारमध्ये महिला मुख्यमंत्री झाल्या. मात्र प्रगत व पुरोगामी महाराष्ट्रात हे घडले नाही, ही सर्वांनीच विचार करण्याजोगी बाब आहे. राजकारणात महिलांना आरक्षण आहे, म्हणून कमीत कमी त्यांची संख्या तरी दिसून येते. मात्र बऱ्याच महिलांना राजकारणाची ओळख नसते व त्या पती किंवा कुटुंबियांच्या निर्देशांनुसार काम करत असतात. राज्याला ‘रबरस्टॅंप’ असलेल्या मुख्यमंत्री किंवा मंत्री नको आहे. महिलांचा राजकारणात टक्का वाढलाच पाहिजे. त्यासाठी जातपितृसत्ताकव्यवस्था दूर सारायला हवी व महिलांनादेखील कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी दिली पाहिजे, असे मत या मान्यवरांनी व्यक्त केले. ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे व नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी या चर्चेचे संचालन केले. लोकमत सखी मंचच्या नेहा जोशी यांनी संचालन तर ‘लोकमत समाचार’चे वरिष्ठ संपादक विकास मिश्रा यांनी आभार प्रदर्शन केले. दरम्यान, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १४ कर्तृत्ववान महिलांना विदर्भस्तरीय लोकमत ज्योत्स्ना सखी सन्मान पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

अमृता फडणवीसांचे सुषमा अंधारेंकडून कौतुकदरम्यान, सुषमा अंधारे यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे जाहीरपणे कौतुक करण्यात आले. अमृता फडणवीस या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असूनदेखील त्यांनी ठराविक चौकटीतून बाहेर येत स्वत:चे करिअर व छंद जोपासले. त्यांना ज्या गोष्टी पटतात त्या करतात. लोकांना काय वाटेल याचा विचार करण्यातच महिलांचे आयुष्य जाते. मात्र अमृता फडणवीस या वेगळ्या आहेत. त्यांनी अनेक परंपरांना छेद दिला आहे, असे अंधारे म्हणाल्या. यावेळी त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरदेखील भाष्य करत त्यांची बाजू घेतली. ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे’ असे म्हटले म्हणून त्यांना राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न होत असेल तर कोणी महिला कशाला ते स्वप्न पाहील, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. 

नेतृत्व करू शकणारी एकही महिला नाहीआश्चर्याची बाब म्हणजे या सर्वपक्षीय महिला नेत्यांनी सद्यस्थितीत राज्यात मुख्यमंत्रीपद सांभाळत नेतृत्व करू शकणारी एकही महिला नसल्याचे प्रतिपादन केले. भविष्यात नक्कीच महिला मुख्यमंत्री मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. ‘रॅपिड फायर राऊंड’मध्ये तुमच्या मनातील मुख्यमंत्री सांगा या मुद्याला महिला नेत्यांनी बगल दिली. सध्याची एकूण स्थितीत पाहता केवळ शिवसेनेच्या नेत्या व विधानपरिषेदच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे नाव महिला मुख्यमंत्रीपदासाठी योग्य ठरू शकते, असे मत प्रा.तांबे यांनी व्यक्त केले

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट