शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या सुपुत्राने ‘ऑपरेशन बालासोर’ राबवून वाचविले शेकडो जणांचे प्राण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2023 21:36 IST

Nagpur News बालासोर येथील रेल्वेच्या भीषण अपघातानंतर तातडीने निर्णय घेऊन पावले उचलीत अनेकांचे प्राण वाचविणारे जिल्हाधिकारी दत्तात्रेय उर्फ दत्ता शिंदे हे मूळचे महाराष्ट्रातील पारनेर तालुक्याचे रहिवासी आहेत. त्यांनी राबविलेल्या 'ऑपरेशन बालासोर' चे सर्व पातळ्यांवरून कौतुक केले जात आहे.

 नरेश डोंगरेनागपूर : एकीकडे मृतदेहांचा खच, त्यात मध्ये-मध्येे दबलेले वेदनांनी विव्हळणारे गंभीर जखमी. मृतांच्या नातेवाइकांच्या किंकाळ्या, आक्रोश अन् वेदनांचा तो क्षण कुणाच्याही काळजाचे पाणी करणारा होता. मीसुद्धा त्या क्षणी सुन्न झालो होतो. मात्र कर्तव्य भावनेने दुसऱ्याच क्षणी भानावर आणले. त्यानंतर ॲम्बुलन्स, अग्निशमन दलाचे बंब, डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी, पोलिस आणि त्यांच्याच तत्परतेने शेकडो देवदूत घटनास्थळी पोहोचले अन् सुरू झाले 'ऑपरेशन बालासोर'. जखमींवर तातडीने उपचार करण्याला प्राधान्य देण्याचा पहिला निर्णय घेतला. त्यानुसार, काहींवर घटनास्थळीच तर इतरांवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचविण्यात यश मिळाले. ही प्रतिक्रिया वजा भावना आहे महाराष्ट्राच्या त्या सुपुत्राची, ज्याने देश-विदेशात चर्चेला आलेल्या बालासोर (ओडिशा) येथील रेल्वेच्या भीषण अपघातानंतरची संपूर्ण परिस्थिती हाताळली. शेकडो जखमींना तातडीने मदत उपलब्ध करून देत त्यांचे प्राण वाचविले. त्यांचे नाव आहे, दत्तात्रेय भाऊसाहेब शिंदे!

महाराष्ट्राच्या पारनेर तालुक्यातील मूळ निवासी असलेले दत्तात्रेय ऊर्फ दत्ता शिंदे बालासोरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून सेवारत आहेत. २ जूनच्या रात्री बालासोरमध्ये भीषण अपघात झाला अन् त्यात तीनशेच्या आसपास व्यक्तींचे जीव गेले. शेकडो जणांना गंभीर दुखापत झाली. अपघातस्थळी पोहोचताच जिल्हाधिकारी शिंदे यांनी जलदगतीने निर्णय घेतले, भरीव मदतकार्यही राबविले. ‘लोकमत’ प्रतिनिधीने आज त्यांच्याशी संपर्क साधून ‘ऑपरेशन बालासोर’ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अत्याधिक व्यस्त असूनही सहकाऱ्यांना आवश्यक निर्देश देता-देताच त्यांनी ‘लोकमत’ला माहितीही दिली. ते म्हणाले, तेथे त्यावेळी खूप अंधार होता. त्यामुळे ५० टॉवर लाइट्सची व्यवस्था करून जखमींना रुग्णालयात हलविणे सुरू केले. सुमारे एक हजार ते बाराशे व्यक्तींना आजूबाजूच्या शहरातील विविध इस्पितळात पाठविले. ठिकठिकाणच्या ॲम्बुलन्स बोलावून काही जखमींवर जागीच उपचार सुरू केले.आम्ही अडीच हजार अन् शेकडो देवदूत‘लोकमत’शी बोलताना शिंदे यांनी देवदूतांची गोष्ट सांगितली. गेल्या सहा दिवसांपासून आम्ही सुमारे अडीच हजार अधिकारी-कर्मचारी काम करीत आहोत. मात्र, अपघात झाल्यापासूनच शेकडो देवदूत येथे अपघातग्रस्तांंच्या मदतीसाठी तहान-भूक विसरून अहोरात्र मदतकार्य करीत आहोत. एक आवाहन केले आणि शेकडो नागरिक रक्तदानासाठी हजर झाले. शेकडो हात जखमींना ॲम्ब्युलन्समध्ये आणि मृतदेह रुग्णालयात पोहोचविण्यास सरसावले. कोणतीही अपेक्षा न करता स्वयंस्फूर्तीने या देवदूतांनी मदत कार्यात दिलेले योगदान अतुलनीय असल्याचेही ते म्हणाले.आता ‘त्यांना’ सर्वोच्च प्राधान्यआता कशाला प्राधान्य देताहात, असे विचारले असता शिंदे म्हणाले, जखमींवर तातडीचे उपचार ही आतापर्यंतची प्रायोरिटी होती. आता मात्र अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना घरपोच डेथ सर्टिफिकेट आणि सरकारी मदत देण्याला प्राधान्य देत आहोत. प्रमाणपत्राशिवाय विम्याची रक्कम आणि अन्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे वेेगवेगळ्या पथकांना डेथ सर्टिफिकेट आणि सरकारी मदत मिळवून देण्यासाठी नियुक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.-----

टॅग्स :GovernmentसरकारOdishaओदिशाAccidentअपघातbalasore-pcबालासोर