शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जातनिहाय जनगणनेला संघाने दीड वर्षाअगोदरच दाखविली हिरवी झेंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 11:45 IST

Nagpur : सामाजिक समरसता व एकात्मतेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी, संघाची भूमिका

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेबाबत घोषणा केली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय याकडे राजकीय व सामाजिक वर्तुळाच्या नजरा लागल्या. केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांनी जे देशासाठी आवश्यक आहे ते सर्व करावे, असे वक्तव्य नागपुरात केले. मात्र संघाकडून जनगणनेच्या समर्थनार्थ आलेले हे पहिलेच वक्तव्य नव्हते. प्रत्यक्षात संघाने दीड वर्षाअगोदरच जातनिहाय जनगणनेला हिरवी झेंडी दाखविली होती. जातनिहाय जनगणना ही मागास समाजाच्या विकासासाठी व्हावी, अशीच भूमिका संघाने २०२३ साली मांडली होती.

जातनिहाय जनगणनेला संघाचा विरोध आहे, या चर्चाना २०२३ मध्ये उधाण आले होते. संघाच्या विदर्भातील एका पदाधिकाऱ्याने केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. जातीनिहाय जनगणना झाल्यास कमी संख्या असलेल्या समाजाच्या मनात न्यूनगंड किंवा जास्त संख्येने असलेल्या समाजात प्रभुत्वाची भावना निर्माण होईल, अशी भूमिका संबंधित पदाधिकाऱ्याने मांडली होती. याबाबत सखोल विचार व्हावा असेदेखील ते म्हणाले होते. त्यांनी केवळ काही शक्यता बोलून दाखविल्या होत्या व जातनिहाय जनगणनेचा विरोध केला नव्हता; परंतु त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाला होता व संघावर टीका सुरू झाली होती. तेव्हा संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी संघाचा जातनिहाय जनगणनेला विरोध नसल्याचे स्पष्ट केले होते. समाजातील अनेक घटक विविध कारणांमुळे अद्यापही मागासलेले आहेत. त्यांच्या विकासासाठी व सशक्तीकरणासाठी सरकार वेगवेगळ्या योजना व उपक्रम राबविते व संघाकडून त्याचे समर्थनच करण्यात येत आहे. जातनिहाय जनगणना झाली तर त्याचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झाला पाहिजे. सोबतच असे करत असताना सामाजिक समरसता व एकात्मतेला धक्का लागणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली नसली तरी डिसेंबर २०२३ च्या त्या भूमिकेवर आजदेखील आम्ही ठाम आहोत, असे एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. 

केरळमधूनदेखील मांडली होती भूमिकादरम्यान, संघाने केरळमधूनदेखील सप्टेंबर २०२४ मध्ये जातनिहाय जनगणनेबाबत भूमिका मांडली होती. हिंदू समाजात जाती आणि जातीय संबंध हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे. तो आपली राष्ट्रीय एकता आणि अखंडतेसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे फक्त राजकारणाच्या नजरेतून याकडे पाहू नये. अनेकदा सरकारला कल्याणकारी योजनांसाठी आकड्यांची आवश्यकता असते. पण, त्याचा उपयोग हा फक्त त्या जातींच्या कल्याणासाठी व्हावा. निवडणुकीतील शस्त्र म्हणून त्याचा उपयोग करण्यात येऊ नये, असे संघाकडून स्पष्ट करण्यात आले होते.

टॅग्स :nagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ