शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक; दीरही पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई
2
बांगलादेशी सैन्याने डोळे वटारले; मोहम्मद युनूस यांच्या गोटात पळापळ, राजीनामा देण्यास तयार
3
हार्वर्ड विद्यापीठात दुसऱ्या देशांतील विद्यार्थ्यांना नो एन्ट्री! ट्रम्प प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
4
Vaishnavi Hagawane Death Case : फरार काळात मटणावर ताव, हगवणे पिता -पुत्राचा फरार काळातील सीसीटीव्ही आला समोर
5
पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली होते टार्गेटवर, ISI एजंट अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान केले उघड
6
आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस...
7
नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
8
जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका
9
पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
10
वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय
11
ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल
12
धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार
13
७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!
14
३,७०० कामगारांची नोकरी वाचली; उद्धव ठाकरेंकडून समधान व्यक्त, कामगार सेनेचे नेते मातोश्रीवर
15
आम्ही तयार आहोत! मनसेशी युतीसाठी उद्धवसेना सकारात्मक; ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिसाद
16
काश्मीरमध्ये अहिल्यानगरचा जवान शहीद; दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संदीप गायकर यांना हौतात्म्य
17
सलमान खानच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; महिलेसह दोघांना वांद्रे पोलिसांकडून अटक
18
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
19
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
20
IPL 2025 : शाहरुख खान काठावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी

नागपुरात सिकलसेल-थॅलेसेमियाचा धोका वाढला

By सुमेध वाघमार | Updated: May 22, 2025 17:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सिकलसेल निर्मूलन अभियान सुरू असतानाच नागपूर येथून चिंता वाढवणारे आकडे समोर आले.

सुमेध वाघमारे, नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सिकलसेल निर्मूलन अभियान सुरू असतानाच, नागपूर येथून चिंता वाढवणारे आकडे समोर आले. मेयो आणि मेडिकलने मिळून १ लाख ३४ हजार ४०८ लोकांची सिकलसेल आणि थॅलेसेमियाची तपासणी केली असता, त्यात ३.५८ टक्के, म्हणजेच ४ हजार ८१७ लोक सिकलसेलचे वाहक (कॅरियर) तर २६७ लोक सिकलसेलचे पीडित (ग्रस्त) असल्याचे निदान झाले आहे. याशिवाय, थॅलेसेमियाचे २१६ रुग्णही आढळून आले आहेत. या दोन्ही आजाराचा धोका वाढल्याचे दिसून येत आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार, भारतात एकूण १.८० कोटी सिकलसेल वाहक आणि १४ लाख सिकलसेल पीडित होते. महाराष्ट्रात १६ हजार ६७४ पीडित आणि २ लाख ९ हजार ६८४ वाहक होते. मागील १३ वर्षांत या आकडेवारीत मोठी वाढ झाल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. आई-वडिलांकडून मुलांना नकळत दिला जाणारा हा आनुवंशिक आजार रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सूचनेनुसार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारात आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, नागपूर महानगरपालिका आणि इतर संबंधित विभागांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) यांनी शहर व ग्रामीण भागात सिकलसेल आणि थॅलेसेमियाची तपासणी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेतून सिकलसेल रुग्णांची वाढती संख्या समोर आली आहे. 

मेयोच्या तपासणीत १,८३७ सिकलसेल वाहकमेयो रुग्णालयाने सिकलसेल आणि थॅलेसेमिया तपासणीची मोहीम हाती घेतली होती. वर्षभरात शहर व ग्रामीण भागातील ५८९ ठिकाणी ५ ते ५५ वर्षे वयोगटातील ४३ हजार ५०० लोकांची तपासणी करण्यात आली. यात १९ हजार १२३ महिला आणि २४ हजार ३७७ पुरुषांचा समावेश होता. या तपासणीत १ हजार ८३७ लोक सिकलसेलचे वाहक (एएस) असल्याचे, तर ५८ लोक सिकलसेलने पीडित (एसएस) असल्याचे निदान झाले. तसेच, १८३ लोकांना थॅलेसेमिया असल्याचे आढळून आले.

मेडिकलच्या तपासणीत २,९८० सिकलसेल वाहकमेडिकल रुग्णालयाने एका वर्षाच्या कालावधीत १५०० पेक्षा जास्त ठिकाणी ५ ते ५५ वर्षे वयोगटातील ९० हजार ९०८ लोकांची सिकलसेल आणि थॅलेसेमियाची तपासणी केली. यात ३८ हजार ५०१ पुरुष आणि ५२ हजार ४०७ महिलांचा समावेश होता. या तपासणीत २ हजार ९८० लोक सिकलसेलचे वाहक (एएस) असल्याचे, तर २०९ लोक सिकलसेलने पीडित (एसएस) असल्याचे निदान झाले. थॅलेसेमियाचे ३३ रुग्णही आढळून आले. तपासणी प्रक्रियेनंतर सर्व सहभागी व्यक्तींना सिकलसेल स्टेटस आयडी कार्ड वितरित करण्यात आले. ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यांचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात आले.

आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी व्यापक तपासणी आवश्यक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या सूचनेवरून सिकलसेल आणि थॅलेसेमियाची तपासणी मोहीम राबवण्यात आली. यातून मिळालेल्या आकडेवारीवरून नागपूर जिल्ह्यात सिकलसेल आणि थॅलेसेमियाची समस्या किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते. या दोन्ही आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी व्यापक तपासणी व जनजागृती मोहिम अधिक तीव्र करण्याची गरज आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवली आहे. -डॉ. रवी चव्हाण, अधिष्ठाता मेयो

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र