शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 03:54 IST

‘जय भीम’ हा क्रांतीचा नारा देत भीमसैनिक तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक झाले.

नागपूर : शतकानुशतके धार्मिक व्यवस्थेच्या गुलामगिरीत जखडलेल्या शाेषित, पीडितांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी समता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माची दीक्षा देऊन नवी क्रांती घडविली. त्या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी महामानवाने मनामनात चेतवलेली समतेची मशाल हाती घेत देश-विदेशातील लाखाेंचा जनसागर शनिवारी दीक्षाभूमीवर अवतरला. ‘जय भीम’ हा क्रांतीचा नारा देत भीमसैनिक तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक झाले.

हातात पंचशील ध्वज, पांढरा पोशाख, उरात भरलेला प्रचंड आत्मविश्वास घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यातील खेड्यापाड्यांमधून लाखाे अनुयायी दाेन दिवसांपासून महामानवाला अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर पाेहोचत आहेत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर भीमसैनिकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. 

विविध कार्यक्रम सकाळी धम्म ध्वजारोहणासह समता सैनिक दलाच्या सैनिकांनी दीक्षाभूमी परिसरात पथसंचलन व तथागत बुद्ध व डाॅ. बाबासाहेबांना मानवंदना दिली. त्यानंतर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्धवंदना तसेच महापरित्राण पाठ करण्यात आले. साेबत २२ प्रतिज्ञांचे पठण करण्यात आले. तसेच देशभरातून आलेल्या इच्छुक नागरिकांनी भिक्खू संघाकडून बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली. दिवसभर लाखाे अनुयायांनी मुख्य स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेत अभिवादन केले. धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा देश-विदेशातील भिक्खू संघांच्या उपस्थितीत पार पडला.यंदा प्रथमच मंचावर कुठल्याही राजकीय नेत्याला स्थान दिले नाही. 

‘बाैद्धगया महाविहार मुक्तिसाठी जगातील बाैद्धांनी एकजूट व्हावे’-नागपूर : काेणत्याही धर्माच्या धर्मस्थळांचे त्याच धर्मीयांकडून संचालन केले जाते. मात्र बिहारमधील बाैद्धगयाचे महाबाेधी विहार बाैद्ध धर्मियांचे तीर्थस्थळ असूनही संचालनावर इतर धर्मियांचा ताबा आहे.

-महाविहार मुक्तिसाठी शंभरपेक्षा अधिक वर्षापासून आंदाेलन सुरू आहे. सरकार शांतीप्रिय बाैद्ध धर्मियांचा अंत पाहत आहे. त्यामुळे जगभरातील बाैद्धांनी गटतटाचा, पंथाचा अहंकार साेडून बाैद्धगया महाविहार मुक्तिसाठी एकजूट हाेण्याची गरज आहे, असे आवाहन ऑल इंडिया बुद्धिस्ट फाेरमचे महासचिव व बाैद्धगया आंदाेलनाचे वाहक अशाेक लामा यांनी केले.

- आज सर्व बाैद्धांनी एकजूट हाेवून लढण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या साेहळ्यात सायंकाळी ते बोलत होते. 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीDasaraदसरा