शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

पाऊस थाेडा वेळ बरसला अन पुन्हा लपला

By निशांत वानखेडे | Updated: July 6, 2024 19:05 IST

नाेंदीलायकही सरी नाही, उलट पारा वाढला : वेधशाळेचा मध्यम पावसाचा अंदाज

नागपूर : सकाळपासून उन निघाल्यानंतर दुपारी ४ वाजताच्या दरम्यान अचानक झालेल्या पावसाने लाेकांना भिजविले खरे, पण हा ओलावा अधिक काळ टिकला नाही. अर्ध्या तासात पाऊस थांबला आणि पुन्हा उन निघाले. इकडे वेधशाळेने नागपूरसह विदर्भात सर्वत्र मध्यम ते जाेरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

जुलैचा पहिला आठवडा संपत असताना पावसाचा जाेर काही वाढलेला दिसत नाही. विदर्भात पाऊस पडताे पण त्यात सातत्य दिसून आले नाही. क्षणापुरता बरसताे आणि निघून जाताे. शुक्रवारीही नागपुरात जाेराची सर आली आणि पुन्हा उघडीप दिली. सारखे चित्र शनिवारीही हाेते. सकाळपासून आकाशात उनही पडले हाेते. दुपारी ४ वाजताच्या सुमारास पावसाची जाेरदार सर नागपुरात पडली. मात्र अर्ध्या तासानंतर पुन्हा उन निघाले. त्यामुळे नागपूर केंद्रावर नाेंदही झाली नाही. हवामान तज्ज्ञांच्या मते हा वळीव पावसाचा प्रकार हाेय. उन निघाल्यामुळे तापमानात अंशत: वाढ झाली व पारा ३४.६ अंशावर नाेंदविला गेला. विदर्भात अकाेला वगळता सर्वत्र तापमान अंशतः वाढले. बुलढाणा, अकाेला व वर्धा या तीन जिल्ह्यात हलक्या सरी बरसल्याची नाेंद झाली.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे पाच दिवस विदर्भात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस हाेण्याची शक्यता आहे. मात्र जाेरदार व संततधार पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Monsoon forecastमोसमी पावसाचा अंदाजmonsoonमोसमी पाऊसRainपाऊसnagpurनागपूर