शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

९ महिन्याच्या बाळावर ‘ओपन हार्ट सर्जरी’; हृदय व फुफ्फुसातून रक्त वाहण्याचा मार्गच बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2023 20:24 IST

Nagpur News ९ महिन्याच्या चिमुकल्यावर ओपन हार्ट सर्जरी करून त्याच्या हृदयातील रक्त वाहण्याच्या चुकीच्या मार्गाला बदलण्यात आले.

सुमेध वाघमारे नागपूर : ९ महिन्याचा चिमुकल्याचा फुफ्फुसातील शुद्ध रक्त हृदयाच्या डाव्या बाजूकडे न जाता उजव्या बाजूकडे जात होते. हृदय आणि फुफ्फुसातून शुद्ध व अशुद्ध रक्त वाहण्याचा हा मार्गच बदलल्याने चिमुकल्याचा जीव धोक्यात आला होता. या आजाराचे निदानही उशीरा झाल्याने गुंतागुंत वाढली होती. परंतु नागपूरच्या डॉक्टरांनी आपले अनुभव व कौशल्याच्या बळावर व इतर डॉक्टरांच्या मदतीने यशस्वी ‘ओपन हार्ट सर्जरी’ करून बाळाला नवे जीवन दिले.

    ग्रामीण भागातील या बाळाला जन्मताच हा आजार होता. या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘कन्जेनायटल सायनोटिक हार्ट डिसीज’ म्हणतात. अनुभवी ‘पेडियाट्रिक हार्ट सर्जन’ डॉ. संदीप खानझोडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या आजाराचे निदान सहाव्या महिन्यात झाले. न्यू इरा हॉस्पिटलमध्ये हे बाळ उपचारासाठी आले तेव्हा बाळाची प्रकृती खालवली होती. उशीरा निदानामुळे गुंतागुंतही वाढली होती. यामुळे शक्य तितक्या लवकर ‘ओपन हार्ट सर्जरी’ करण्याचा सल्ला दिला. 

हृदयाचे छिद्रही केले बंद हृदय आणि फुफ्फुसातून रक्त वाहण्याचा मार्गच बदलणे ही जन्मजात रक्त वाहिन्यांची संरचनात्मक विकृती आहे. जी गर्भाच्या विकासादरम्यान होते. जन्मजात विकृती असलेल्या मुलांमध्ये हे मृत्यूचे प्रमुख कारण ठरते. पालकांनी तातडीने ओपन हार्ट सर्जरीला परवानगी दिल्यानंतर डॉ. संदीप खानझोडे व हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती यांच्या नेतृत्वाखालील सर्जिकल टीमने ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी केली. या शस्त्रक्रियेदरम्यान हृदयात असलेले छिद्रही बुजविण्यात आले. 

-या आजाराचे प्रमाण १० टक्केडॉ. संचेती म्हणाले, लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या एकूण हृदयरोगामध्ये ‘कन्जेनायटल सायनोटिक हार्ट डिसीज’चे प्रमाण साधारण १० टक्के आहे. या आजाराचे निदान पहिल्या महिन्यात होते. परंतु दोन ते तीन टक्केबाळांमध्ये याचे निदान उशीरा होऊ शकते. या बाळाला तीन महिन्यानंतर हृदयाच्या समस्या उद्भवल्या, असेही ते म्हणाले. या शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. श्रीकांत बोबडे, बालरोग क्रिटिकल इंटेन्सिव्हिस्ट टीमचे नेतृत्व करणारे डॉ. आनंद भुतडा, डॉ. रोहित असरानी, डॉ. कल्याणी कडू व डॉ. नीरव पटेल यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

टॅग्स :Healthआरोग्य