शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी रडगाणे थांबवावे, आमच्यासोबत विकासाचे गाणे गावे

By योगेश पांडे | Updated: December 19, 2024 15:24 IST

एकनाथ शिंदे : गिरे तो भी टांग उपर अशी भूमिका विरोधकांनी सोडावी

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर  : राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटिंग करत विरोधकांवर राजकीय आसूड ओढले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी टीकास्त्र सोडले. काल सभागृहात पाहुणे कलाकार येऊन गेले. मीडीयासमोर रडगाणे गाण्यापेक्षा सभागृहात येऊन बाजू मांडली पाहिजे. काही लोक पार्टटाईम म्हणून सभागृहाचा वापर करतात. किसी को विरासत मे गद्दी मिलती है, पर हर किसी को बुद्धी नही मिलती. त्यांच्या डोळ्यात पराभवाचे पाणी आहे, त्यामुळे त्यांना जनतेचा जल्लोष दिसत नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी राजकीय चिमटे काढले.

गेल्या अडीच वर्षांत महायुतीने कल्याणकारी योजनांचे विक्रमी काम केले. एकही सुटी न घेता टीम म्हणून काम केले. त्यामुळे निकालात इतिहास घडला. आमच्या सरकारने २४ बाय ७ काम केले व घसरलेला राडा रुळावर आणला. महायुती सरकारची नवी इनिंग सुरू झाली आहे. जनतेच्या विश्वासामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. निवडणूकीत विरोधकांना मतदारांनी आस्मान दाखविले. अडीच वर्ष विरोधकांनी शिव्याशाप दिले व आरोप केले. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही हे सिद्ध झाले. गिरे तो भी टांग उपर अशीच विरोधकांची अवस्था आहे. विरोधी पक्षांवर जनतेने बहिष्कार टाकला आहे. त्यांना सगळे कळत आहे, पण वळत नाही. विरोधकांनी आता तरी रडगाणे थांबवायला हवे. आता त्यांनी आमच्यासोबत विकासाचे गाणे गावे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

अडीच वर्षांअगोदर महाविकासआघाडीची भूमिका कल करे सो परसो असे काम होते. त्यांनी सगळेच बंद करण्यावर भर ठेवला होता व अगदी हसणे-जगणेदेखील बंद केले होते. बंदसम्राट घरात होते व फेसबुक लाईव्ह जोरात होते. आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणणारे निवडणूक आयोग, विधीमंडळ, न्यायालय व जनतेच्या न्यायालयात हरले. जिंकता येईना ईव्हीएम वाकडे अशी विरोधकांची गत झाली आहे. पराभवाचे खापर फोडायला कुणीतरी हवे म्हणून ईव्हीएम आंदोलन सुरू आहे, असा आरोप शिंदे यांनी लावला.

नवाबी सरकारपेक्षा गुलाबी सरकार चांगलेजे लोक फडणवीस यांना राजकारणातून संपविण्याची भाषा करत होते ते पुष्पगुच्छ घेऊन भेटीला पोहोचले. सरड्यापेक्षा वेगाने रंग बदलण्याची किमया ते करत आहेत. त्यांच्या नवाबी सरकारपेक्षा आमचे गुलाबी सरकार चांगले ठरले, असे शिंदे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर