शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदाच्या दावेदाराचे नाव मतदार यादीतून गायब ! दुसऱ्याच शहराच्या यादीत आढळले नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 16:24 IST

कोंढाळी येथील प्रकार : वानाडोंगरीच्या मतदार यादीत आढळले नाव

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढाळी : नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच नगराध्यक्ष व प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यासोबतच निवडणूक विभागाने मतदार यादी प्रकाशित केले. कोंढाळी शहराच्या मतदार यादीतून नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या व्यक्तीचे नाव वगळण्यात आले असून, त्यांचे नाव हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी शहरातील मतदार यादीत समाविष्ट केल्याचा घोळ उघड झाला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोंढाळी शहरात मतदान केले होते.

कोंढाळी (ता. काटोल) नगरपंचायतची ही पहिलीच निवडणूक आहे. संजय नत्थुजी राऊत, रा. कोंढाळी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी अशी ओळख असून, सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये सक्रीय आहे. त्यांना ग्रामपंचायत प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्याने तसेच नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी जाहीर करण्यात आल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. त्याअनुषंगाने त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे. 

दरम्यान, नगरपंचायत कार्यालयात ८ ऑक्टोबरला मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. संजय राऊत यांनी मतदार यादी चाळून बघितली असता, त्यांना त्यांचे नाव यादीतून वगळले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चौकशीअंती त्यांचे नाव कोंढाळी नगरपंचायतमधून वगळून वानाडोंगरी नगरपालिकेच्या यादीत ऑनलाइन पद्धतीने समाविष्ट केल्याचे उघड झाले. संजय राऊत यांनी सन २००३ पासून तर २०२३ पर्यंत सलग २० वर्षे कोंढाळी ग्रामपंचायतचे सदस्यपद भूषविले आहे. सन २०२४ मध्ये या ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रुपांतर करण्याचा प्रस्ताव त्यांच्याच कार्यकाळात मंजूर करण्यात आला. जनमानसांत त्यांची प्रतिमा चांगली आहे. त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याने सामान्य मतदारांनी नवल व्यक्त केले आहे. आचारसंहिता लागू करण्यापूर्वी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून या प्रकाराचा मुख्य सूत्रधार कोण आहे, हे शोधून काढणे गरजेचे आहे. 

शहानिशा, सुनावणी न करता मंजुरी

७ डिसेंबर २०२४ रोजी हिंगणा तहसील कार्यालयाला ऑनलाइन अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे संजय राऊत यांचे नाव कोंढाळी येथील मतदार यादीतून वगळून वानाडोंगरी येथील यादीत समाविष्ट केल्याची माहिती हिंगणा तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना दिली. निवडणूक विभागाने या अर्जाची कुठलीही शहानिशा केली नाही किंवा त्यावर आक्षेप व सुनावणी न घेता १२ डिसेंबर २०२४ रोजी या अर्जाला मंजुरी दिली. पुढे २ एप्रिल २०२५ रोजी त्यांचे नाव कोंढाळी येथून कमी करून वानाडोंगरी येथे समाविष्ट केले. नाव कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या अर्ज क्रमांक - ९ सोबत संजय राऊत यांचे आधारकार्ड अथवा कुठलीही कागदपत्रे जोडलेली नाहीत. त्या अर्जावर बीएलओची स्वाक्षरी देखील नाही. हिंगणा तहसील कार्यालयाने शहानिशा न करता अर्ज क्रमांक ७ काटोल तहसील कार्यालयाला पाठविला व त्यांचे नाव वगळले.

"माझे नाव राजकारण व हेतुपुरस्सर मतदारयादीतून वगळण्यात आले आहे. नाव वगळण्यासाठी मी निवडणूक विभागाकडे ऑनलाइन अथवा ऑफलाइन अर्ज केला नव्हता. या संदर्भातील कोणत्याही अर्जावर मी स्वाक्षरी देखील केली नाही. यासंदर्भात मी काटोल तहसील कार्यालयात चौकशी केली. माझे नाव ऑनलाइन अर्ज करून वानाडोंगरी येथे स्थानांतरीत केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा अर्ज कुणी केला, हे मात्र अधिकाऱ्यांनी सांगितले नाही. यासंदर्भात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार आहे."- संजय राऊत, कोंढाळी, ता. काटोल

English
हिंदी सारांश
Web Title : Mayoral hopeful's name vanishes from voter list, found elsewhere.

Web Summary : Sanjay Raut, a strong Nagaradhyaksha contender in Kondhali, discovered his name missing from the local voter list. It mysteriously appeared in Wanadongri. Raut alleges political conspiracy behind the voter list error and plans to appeal to the High Court.
टॅग्स :nagpurनागपूरVotingमतदानElectionनिवडणूक 2024ZP Electionजिल्हा परिषदElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग