नंदनवनमधील खून झाला ‘डबल मर्डर', जखमी तरुणाचाही मृत्यू

By योगेश पांडे | Published: February 11, 2024 07:06 PM2024-02-11T19:06:59+5:302024-02-11T19:07:05+5:30

पोलिसांकडून तीनही आरोपींना अटक : १० दिवसांत दोन ‘डबल मर्डर’

The murder in Nandanvan was a double murder, the injured youth also died | नंदनवनमधील खून झाला ‘डबल मर्डर', जखमी तरुणाचाही मृत्यू

नंदनवनमधील खून झाला ‘डबल मर्डर', जखमी तरुणाचाही मृत्यू

नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री झालेल्या खुनामुळे खळबळ उडाली होती. आता याचादेखील ‘डबल मर्डर’च्या घटनेत समावेश झाला आहे. या घटनेतील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांकडून या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. १० दिवसांत दोन ‘डबल मर्डर’ व इतर चार खून झाल्याने शहराच्या गुन्हेगारीची राज्यभरात चर्चा आहे.

पैशांच्या उधारीच्या मुद्द्यावरून शुक्रवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास विलास उर्फ मटर रामकृष्ण वानखेडे (३२, हिवरी नगर, ह.मु धरमनगर, भरतवाडा), नितीन रामकृष्ण वानखेडे (२७, धरमनगर, भरतवाडा) व शुभम उर्फ चुक्का छोटेलाल बिरहा (३२, धरमनगर, भरतवाडा) यांनी नीरज शंकर भोयर (२८, गरोबा मैदान) व विशाल राऊत (२७, क्वेटा कॉलनी) यांच्यावर हल्ला केला व फरशीने वार केले. यात नीरजचा मृत्यू झाला होता तर विशाल गंभीर जखमी होता. त्याला उपचारासाठी मेडिकल इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचादेखील मृत्यू झाला. विशालचा भाऊ हिमांशूच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी खबऱ्यांच्या नेटवर्क तसेच ई-सर्व्हेलन्सच्या माध्यमातून आरोपींचा शोध केला व शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अटक केली.

जुगार अड्ड्यांवर नियंत्रण कधी ?
शहरातील नंदनवन, लकडगंज, सक्करदरा या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डे चालतात. मात्र पोलिसांच्या दुर्लक्षामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. या प्रकरणातील आरोपी विलास हादेखील जुगार अड्डा चालवायचा. विलास व नीरज त्यात कधी कधी सहकार्य करायचे. पैशांच्या देवाणघेवाणीतूनच त्यांच्यात वाद झाले होते.
 

Web Title: The murder in Nandanvan was a double murder, the injured youth also died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर