शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

आमदार-खासदार घडविणार भक्तांना श्रीरामाचे दर्शन

By योगेश पांडे | Updated: January 5, 2024 13:23 IST

नागपुरात हिवाळी अधिवेशनावेळी झालेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत पक्षश्रेष्ठींनी याबाबत आमदारांना माहिती दिली.

नागपूर : अयोध्येतील राम मंदिरात श्रीराम प्राणप्रतिष्ठेसाठी भाजपकडून वातावरणनिर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. या सोहळ्यानंतर प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघातून किमान ५ हजार नागरिकांना अयोध्या मंदिराच्या दर्शनासाठी नेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नागपुरात हिवाळी अधिवेशनावेळी झालेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत पक्षश्रेष्ठींनी याबाबत आमदारांना माहिती दिली. त्याअंतर्गत मतदारसंघातील ५ हजार नागरिकांना टप्प्याटप्प्याने अयोध्येत नेण्यात येईल. तेथे पक्षाकडून निवास, भोजन, प्रत्यक्ष मंदिरात नेणे इत्यादी बाबींची व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी विशिष्ट पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अख्खी रेल्वेगाडीच आरक्षित करणारविधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील लाखो नागरिकांना अयोध्येला नेणार आहे. एकाच मार्गावरील मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेगाड्याच बुक करण्यात येणार आहेत. त्यास ‘रामलला दर्शन विशेष ट्रेन’ असेच नाव देणार आहे.

२० हजार लोकांची जबाबदारी यांच्यावर आमदारांसोबतच भाजपने राज्यातील सर्व खासदारांनादेखील विशिष्ट लक्ष्य दिले आहे. त्यांना २० हजार नागरिकांना दर्शन करावयाचे आहे. यासोबतच जेथे भाजपचे आमदार, खासदार नाहीत तेथे लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक प्रमुख अथवा प्रमुख पदाधिकाऱ्यांना याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याMLAआमदारMember of parliamentखासदारBJPभाजपा