शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

‘सरकार’चा खात्मा झाल्याने माओवाद्यांची राजधानी हादरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 07:46 IST

नीलम सराय, धोबी पहाड आणि कर्रेगुट्टा मोहिमांमुळे नक्षल्यांचे मनोधैर्य पार खचले आहे.  

राजेश शेगाेकार, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : अबुझमाडच्या जंगलात २१ मे रोजी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी २७ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यात माओवादी सुप्रीम कमांडर नंबाला केशवराव ऊर्फ बसवा राजू याचाही समावेश आहे. हा ‘माओ सरकार’ किंवा ‘जनताना सरकार’चा प्रमुख. त्याचाच अंत झाल्याने ही नक्षलविरोधी लढ्यातील ऐतिहासिक ठरली आहे.  १६ दिवस चाललेल्या कर्रेगुट्टा मोहिमेत १४ मे  राेजी ३१ नक्षलींचा खात्मा झाला व लाल गडावर तिरंगा फडकवल्यानंतर केवळ सहा दिवसांत अबुझमाडमध्ये निर्णायक कारवाई झाली. नीलम सराय, धोबी पहाड आणि कर्रेगुट्टा मोहिमांमुळे नक्षल्यांचे मनोधैर्य पार खचले आहे.  

नक्षल्यांची राजधानी

१९८०च्या दशकात नक्षलवाद्यांनी अबुझमाड जंगलात प्रवेश केला. आज या भागात त्यांच्या ‘माओ सरकार’चा अघोषित अंमल आहे. केंद्रीय माओ नेत्यांच्या सुरक्षेसाठी बंकर, माओवादी सैनिकी शाळा व प्रशिक्षण कॅम्पही येथेच  आहेत. अबुझमाड ही नक्षल्यांची राजधानी आहे. 

कसे आहे अबुझमाड? 

 ‘अबुझ’ म्हणजे माहिती नसलेले तर ‘माड’ म्हणजे उंच व रहस्यमय प्रदेश. दिवसाही सूर्याची किरणे पाेहोचत नाहीत असे हे दाट जंगल. भामरागडमधील बिनागुडापासून छत्तीसगडच्या दंतेवाडा, तेलंगणच्या खम्मम, ओडिशाच्या मलकानगिरीपर्यंत ४ हजार चौरस कि.मीटरमध्ये पसरले आहे.  

माओवाद्यांचे प्रवेशद्वार बंद

दक्षिण गडचिरोलीचा परिसर छत्तीसगड व तेलंगणा सीमेला जोडून आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेने दक्षिणवर लक्ष केंद्रित केले आहे. यावर्षी नेलगुंडा, पेनगुंडा व कवंडे या  भामरागड तालुक्यातील सीमेवरील गावांमध्ये पोलिस ठाणे सुरू करण्यात आले. त्यामुळे माओवाद्यांचे जिल्ह्यातील प्रवेशद्वार बंद झाले आहे.

...दलम निष्क्रिय 

२०२४ पर्यंत गडचिरोलीत नक्षल्यांचे सहा दलम सक्रिय होते. त्यापैकी टिपागड व कसनसूर या दोन दलमचा खात्मा झाला आहे. अहेरी, गट्टा, भामरागड व कंपनी क्र. १० हे चारच दलम सक्रिय असले तरी नवीन भरती नसल्याने उत्तर गडचिरोली नक्षलमुक्त झाले.

कर्रेगुट्टावर विजय मिळविल्यावर येथील नक्षलवाद्यांनी  अबुझमाड येथे आश्रय घेतला हाेता. सुरक्षा दलाने निर्णायक कारवाई केली. यात माओ सरकाराचा सर्वाेच्च नेताच मारला गेल्याने या चळवळीचे कंबरडेच माेडले आहे. आता शस्त्र टाकण्याशिवाय नक्षल्यांसमाेर पर्याय नाही. - संदीप पाटील, महानिरीक्षक, नक्षलविराेधी अभियान महाराष्ट्र

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादी