शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पिपंरी-चिंचवडमध्ये ‘लिव्ह-इन पार्टनर’ची हत्या करणाऱ्याला नागपुरात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2022 20:55 IST

Nagpur News पिंपरी चिंचवडमध्ये ‘लिव्ह इन पार्टनर’ची हत्या करून फरार झालेल्या तरुणाला नागपुरात सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे.

ठळक मुद्देनवीन प्रेयसी मिळाल्याने केली हत्या

नागपूर : पिंपरी चिंचवडमध्ये ‘लिव्ह इन पार्टनर’ची हत्या करून फरार झालेल्या तरुणाला नागपुरात सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. नवीन प्रेयसी मिळाल्याने त्याने ‘लिव्ह इन पार्टनर’ची हत्या केली. पोलिसांनी आरोपी तरुणाला त्याच्या मैत्रिणीसह ताब्यात घेतले आहे.

पुण्यात राहणाऱ्या २० वर्षीय आशिष भोसलेची दीड वर्षापूर्वी साताऱ्यातील कीर्ती नावाच्या तरुणीशी मैत्री झाली होती. कीर्तीला एका कपड्याच्या शोरूममध्ये नोकरी लावून दिली. कुटुंबीय कीर्तीसोबतच्या मैत्रीच्या विरोधात असल्याने आशिषने घरातून पळ काढला आणि पिंपरी-चिंचवडच्या वाकडमध्ये नऊ महिन्यांपासून कीर्तीसोबत लिव्ह इनमध्ये पतीसारखा राहू लागला. आशिष काम करत असलेल्या शोरूममध्ये डायना नामक तरुणी नोकरीला लागली व दोघांची जवळीक वाढली. दोघे प्रेमात पडले. हे जाणून कीर्तीला धक्का बसला. कीर्ती प्रेमात अडथळा ठरत असल्याने आशिषने तिचा छळ सुरू केला. त्यांनी तिचा काटा काढण्याची योजना आखली आणि १९ जुलै रोजी तिची हत्या केली. कीर्तीने आत्महत्या केल्याचे त्याने डायनाला सांगितले व आशिषच्या सांगण्यावरून ती मुंबईत राहायला गेली.

दरम्यान, कीर्तीच्या भावाच्या तक्रारीवरून वाकड पोलिसांनी आशिषविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. तपासात पोलिसांना प्रेयसी डायनाही बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. डायनाच्या कुटुंबीयांनीही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस दोघांचा शोध घेत होते. आशिष आणि त्याची मैत्रीण डायना नागपुरात असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. अमरावती मार्गावरील बोले पेट्रोल पंप येथे मोबाइलचे लोकेशन आढळून आले. वाकड पोलिसांनी सीताबर्डी पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक अतुल सबनीस, अमोल कचोरे यांनी पेट्रोल पंपाजवळून दोघांनाही ताब्यात घेतले. ट्रॅव्हल्स बसने पुण्याला जाण्यासाठी दोघेही तेथे पोहोचले होते. २० जुलै रोजी दोघेही वाकडहून मुंबईला गेले. तेथून ते नागपुरात परतले. सीताबर्डी पोलिसांच्या माहितीवरून वाकड पोलीस शुक्रवारी नागपुरात दाखल झाले व दोघांनाही त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी