सुमेध वाघमारे नागपूर : ती सात वर्षांची होती तेव्हा एका आजारपणामुळे तिला बहिरेपणा आला. तिच्या बहिणीने तिला लीप रिडींग शिकविले. त्या बळावर तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. ती इथेच थांबली नाही तर एमपीएससी परीक्षा पास केली. नोकरी मिळवली. परंतु बहिरेपणामुळे हातून चूक घडू नये म्हणून तिच्या वडिलांनी तिला कॉक्लीअर इम्प्लांटसाठी तयार केले. या शस्त्रक्रियेसाठी खासगी नाहीतर मेयो सारख्या शासकीय रुग्णालयावर विश्वास दाखविला. इएनटी विभागातील डॉक्टरांनी पहिल्यांदाच ३५ वर्षीय महिलेवर कॉक्लीअर इम्प्लांट यशस्वी केले. राज्यातील शासकीय रुग्णालयामधील ही पहिली शस्त्रक्रिया ठरली. जिद्द आणि तंत्रज्ञानाची किमया म्हणून २८ वषार्नंतर ती पहिल्यांदाच आता आवाज ऐकणार आहे.
शितल लोणारे बहिरेपणाला हरविणाºया महिलेचे नाव. शितल पहिल्या वर्गात असताना म्हणजे सात वर्षांची असताना गालफूगीमुळे तिने ऐकण्याची क्षमता गमावली. उपचारांनंतरही तिची श्रवणशक्ती परत आली नाही. ती निराश झाली होती. तिची जुळी बहिण मीनलने तिला ह्यलिप्स रिडींगह्ण शिकवले. त्यामुळेच ती पुढे शिक्षण घेऊ शकली. प्रचंड परिश्रम घेऊन एमपीएससी परीक्षेत दिव्यांग कोट्यातून प्रथम क्रमांक मिळवला. जीएसटी विभागात विक्रीकर अधिकारी म्हणून नोकरीला लागली. लवकरच तिची पदोन्नतीही होणार आहे. परंतु, मास्क घातलेल्या किंवा हळू बोलणाºया व्यक्तींचे ओठ दिसत नसल्याने कामात चूक होण्याची भीती वाटत होती. याची दखल तिचे वडील, पुरणदास लोणारे यांनी घेतली. यासाठी मेयोमधील कान, नाक व घसा विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांच्याशी संपर्क साधला. डॉ. वेदी यांनी यापूर्वी ११५ यशस्वी कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यामुळे लोणारे कुटुंबीयांनी मेयोमध्येच ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
१९ लाख रुपयांचे इम्प्लानटया शस्त्रक्रियेसाठी लागणारे १९ लाख रुपयांचे, 'सीआय ६३२' नावाचे अत्याधुनिक कॉक्लीअर इम्प्लांट लोणारे कुटुंबीयांनी स्वत: खरेदी केले. यात 'स्मार्ट नॅव्हिगेशन' या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. यासाठी कॉक्लीअर इम्प्लांटच्या एरिया मॅनेजर स्वाती सोनार (पुणे) आणि नागपूरचे हर्षल चिताडे यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. ही शस्त्रक्रिया डॉ. वेदी यांच्यासह डॉ. रितेश शेलकर, डॉ. वैभव चंदनखेडे भूल तज्ज्ञ डॉ. वैशाली शेलगावकर, डॉ. फटींग व डॉ. प्रियाल शेलकर यांनी यशस्वी केली. मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी डॉक्टरांच्या या यशाचे कौतुक केले.
पहिला आवाज बहिणीचा एैकण्याची इच्छा२८ वषार्नंतर पहिला आवाज कोणाचा एैकणार, या प्रश्नावर तिने बहिण मिनलकडे बोट दाखविले. ज्या बहिणीने मला मोठ्या कष्टाने लिप रिडींग शिकविले तिचा आवाज एैकण्यासाठी उत्सूक असल्याचे आणि प्रत्युत्तर म्हणून तिला मिनल म्हणूनही हाक मारायचे असल्याचे तिने हाताच्या खाणाखुणा करून सांगितले.
दोन आठवड्यानंतर ती एैकू शकणार"राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील नागपूरच्या मेयोमध्ये पहिल्यांदाच प्रौढ व्यक्तीवर कॉक्लीअर इम्प्लांट करण्यात आले. शिवाय, पहिल्यांदाच 'स्मार्ट नॅव्हिगेशन' या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. शस्त्रक्रियेत कॉक्लीअर इम्प्लांटचा इनर पार्ट लावण्यात आला. दोन आठवड्यानंतर आऊटर पार्ट लावण्यात येईल. त्यानंतर ती एैकू शकणार आहे."- डॉ. जीवन वेदी, प्रमुख इएनटी विभाग मेयो.