शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणकर्त्यांसोबत निरागस जिवाचा प्रदीर्घ संघर्ष !

By नरेश डोंगरे | Updated: June 12, 2024 19:36 IST

गुन्हेगारांच्या स्पर्शातून झाली असावी, कलुषित मनसुब्याची जाणीव !

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर :  सहा महिन्यांचा निरागस, निष्पाप जीव. ज्याला काहीच कळत नाही, तो गुन्हेगारांशी संघर्ष करू शकतो का..., हा प्रश्न कुणी केला तर ऐकणारी मंडळी प्रश्न करणाऱ्याच्या बुद्धीमत्तेवर संशय घेईल अन् शंभर पैकी शंभर जणांचे एकसाथ उत्तर असेल, नाही...! मात्र, ही एक अशी सत्यघटना आहे की, या घटनेतील अवघ्या सहा महिन्याच्या निरागस चिमुकल्याने त्याचे अपहरण करणारांशी प्रदीर्घ संघर्ष केला. आपण सुरक्षित हातात पोहचलो, अशी जाणीव झाल्यानंतरच त्या निरागस जिवाचा संघर्ष थांबला. अचंबित करणारे हे प्रकरण नागपुरातील आहे.

जगाच्या रहाटगाडग्यापासून अनभिज्ञ, स्वर्गीय सुखाचा आनंद घेत तो त्याच्या आईच्या कुशित निजून होता. त्याचे वय अवघे सहा महिने, दुनियादारी काय ते कळण्याचा प्रश्नच नाही. आईची कुशी अन् पित्याची छाती, हीच त्याची दुनिया. मात्र,  तेलंगणात नेऊन विकण्याच्या प्रयत्नात ६ जूनला येथील रेल्वे स्थानकावरून या निष्पाप जीवाचे अपहरण करण्यात आले होते. गुन्हेगारांनी जेव्हा त्याला त्याच्या आईवडीलांपासून दूर करून, वाईट हेतूने जवळ घेतले. तेव्हा त्या निरागस जिवाला गुन्हेगारांच्या कलुषित मनसुब्याची कदाचित स्पर्षातून जाणीव झाली असावी. त्यामुळे तो सारखे आक्रंदन करू लागला. तो विरोध करू शकत नव्हता मात्र त्याचे अपहरण करून त्याला विकण्याचा घाट घालणाऱ्या गुन्हेगारांसोबत त्याने एक अनोखी संघर्षाची भूमीका घेतली. तो त्यांच्या हातचे पाणीही प्यायला नाही. रडून रडून थकायचे अन् झोपी जायचे. पुन्हा जाग आली की रडायचे, असेच त्याचे सुरू होते. अखेर त्या निष्पाप जिवाचा संघर्ष फळाला आला अन् त्याच्या मदतीला पोलिसांच्या रुपातील देवदूत धावून आले. आरोपींना बेड्या ठोकल्या अन् त्यांच्या तावडीतून चिमुकल्याला आपल्या ताब्यात घेतले. त्याला दूध पाजले, पाणी पाजले अन् परत त्याच्या आईच्या पदरातही आणून घातले. 

या घटनेची  रेल्वे पोलिसांना तातडीने तक्रार मिळाल्यानेच तपासाचे चक्र गतीमान झाले अन् प्रकरणाचा शेवट गोड झाला. चिमुकला त्याच्या आईच्या कुशित पोहचला. तर, सर्व आरोपी मंगळवारी तुरूंगात पोहचले. मात्र, तपासातून पुढे आलेले तीन वेगवेगळे पैलू या प्रकरणाला आणखीनच हृदयस्पर्षी बनवून गेले.-----------------------

((१))'ती'चीही माया ओतप्रोतच !भिक्षा मागून खाणारी असली तरी तिची ममता ईतर 'आई - माई' सारखीच ओतप्रोत होती. कुशित पहुडलेल बाळ दिसत नसल्यापासून तो ते परत कुशित येईपर्यंत ती सैरभैर होती. खाणे-पिणे सगळेच हराम झाले होते, त्या मातेसाठी. दुरावलेला चिमुकला एकदाचा २०-२२ तासानंतर तिच्या कुशित आला. तिने त्याला पदराआड घेऊन दुधाचा घोट दिला, तेव्हाच तिची तहानभूक जागृत झाली. ------------

((२))गुन्हेगारांना संवेदना नसतातगुन्हेगारांना भाव-भावना, संवेदना नसते. आपण त्याच्या जनमदात्यांपासून हिरावून आणलेला चिमुकला १२ -१४ तास सारखा रडतो, आक्रंदन करतो. त्याला काही खाता येत नाही, दुधच काय पाणीही पीत नाही.  हे लक्षात येऊनही अपहरणकर्ते आरोपी 'सुनील-माया'वर कसलाच फरक पडला नव्हता. प्रवासात त्यांना मात्र जेव्हा भूक लागली, ईच्छा झाली तेव्हा ते खायचे, प्यायचे. एवढेच काय, पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून नागपूरला परत येईपर्यंत आरोपी पोलिसांच्या वाहनात मस्तपैकी घोरत पडलेले (झोपून) होते. -------------

((३))कर्तव्यकठोर, मात्र दयावानही !खाकी कर्तव्यकठोर असली आणि गुन्हेगारांशी ती काहीशी कठोर वागत असली तरी वेळप्रसंगी ती द्रवतेच. वेळप्रसंगी पोलीस दयावान बनतोच. त्याचाही प्रत्यय या प्रकरणात आला. आरोपी आणि त्यांच्या तावडीतील बाळ परत घेऊन नागपूरकडे येताना बाळाची प्रकृती ठिक आहे की नाही, याची पोलिसांनी आधी शहानिशा करून घेतली. आईवडीलांपासून दूर असल्याने प्रवासात त्याला काय दिले पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, त्याची सर्व माहिती त्यांनी तेथील डॉक्टरकडून घेतली. प्रवासात मध्ये-मध्ये जेव्हा तो चिमुकला रडायचा, तेव्हा प्रत्येकच पोलीस त्याला आलटून पालटून जवळ घेऊन, मायेची उब देऊन निजवण्याचा प्रयत्न करीत होते.

टॅग्स :nagpurनागपूर