शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय न्याय संहिता म्हणते, संघटित गुन्हेगारीमध्ये पती-पत्नीला शिक्षा नाही

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: July 21, 2024 18:18 IST

वादग्रस्त तरतुदीला हायकोर्टात आव्हान : केंद्र सरकारला मागितले स्पष्टीकरण

नागपूर: संघटित गुन्हे करणाऱ्याला जाणिवपूर्वक आश्रय दिल्यामुळे किंवा लपवून ठेवल्यामुळे त्याच्या पत्नी किंवा पतीला शिक्षा केली जाणार नाही, अशी वादग्रस्त तरतुद भारतीय न्याय संहितामध्ये करण्यात आली आहे. त्याविरुद्ध नागपूर येथील भास्कर देवासे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून यावर येत्या ९ ऑगस्टपर्यंत स्पष्टीकरण मागितले आहे.

याचिकेवर न्यायमूर्तिद्वय विभा कंकणवाडी व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. देशामध्ये १ जुलै २०२४ पासून भारतीय दंड विधानच्या जाग्यावर भारतीय न्याय संहिता कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यातील संघटित गुन्हेगारीच्या कलम १११ यामधील उपकलम ५ मध्ये संघटित गुन्हे करणाऱ्याला जाणिवपूर्वक आश्रय देणाऱ्या किंवा लपवून ठेवणाऱ्या व्यक्तीकरिता किमान तीन वर्षे सश्रम कारावास ते जन्मठेप अणि किमान पाच लाख रुपये व त्यापेक्षा जास्त आर्थिक दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, या उपकलमातील परंतुकामध्ये ही तरतुद गुन्हेगाराच्या पत्नी किंवा पतीला लागू होणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. हे परंतुक अवैध आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. हे परंतुक घटनाबाह्य ठरवून रद्द करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. रजनीश व्यास यांनी बाजू मांडली.

फौजदारी न्याय प्रणालीस धोकादायकवादग्रस्त तरतुद फौजदारी न्याय प्रणालीकरिता धोकादायक आहे. तसेच, फौजदारी कायद्याच्या उद्देशाची आणि समानतेच्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली करणारी आहे, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. गुन्हेगाराची पत्नी किंवा पती यांच्या ऐकमेकांप्रती असलेल्या कर्तव्यांपेक्षा त्यांचे एक नागरीक म्हणून देशाप्रती असलेले कर्तव्य श्रेष्ठ आहे. त्यामुळे पती असो वा पत्नी, गुन्हेगाराला कोणीही मदत करू शकत नाही. देशात अशा प्रकारची सवलत संविधानिक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीलाही नाही, असेसुद्धा याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCourtन्यायालय