शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

हॉटेल्स क्षेत्राला इंडस्ट्रीजचा दर्जा, पण सोईसुविधा केव्हा? - तेजिंदरसिंग रेणू

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 31, 2024 20:10 IST

हॉटेल्स क्षेत्राला बूस्ट मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पर्यटन धोरण जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील विविध हॉटेल्स असाेसिएशन्सनी राज्य सरकारकडे आहे

नागपूर : महाराष्ट्र सरकारने हॉटेल्स असोसिएशन्सच्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर सन २०२१ मध्ये राज्यातील हॉटेल्सला इंडस्ट्रीजचा दर्जा दिला. पण राज्यातील इंडस्ट्रीजला मिळत असलेल्या सोईसुविधा हॉटेल्स क्षेत्राला अजूनही उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. याकरिता हॉटेल्स असोसिएशनने राज्य सरकारला अनेकदा निवेदने देऊन वीजदर, पाणी व प्रॉपर्टी कर हे इंडस्ट्रीज सारखेच हॉटेल्सकडून आकारावेत, अशी मागणी लावून धरली आहे.

या सोईसुविधांच्या पूर्ततेसाठी तातडीने घोषणा करावी. संपूर्ण राज्याची टेरेस रेस्टॉरंट पॉलिसी एकसमान असावी. मुंबई आणि पुणेकरिता ठरली आहे. सध्या अनेक फ्लॅट्समध्ये सोईसुविधा नसतानाही हॉटेल्स सुरू आहेत. त्यावर नियंत्रणासाठी सरकारने हॉटेल्सच्या संचालनासाठी मार्गदर्शन तत्त्वे लागू करावीत अर्थात प्राधिकरणाची घोषणा करावी. हॉटेल्स क्षेत्राला बूस्ट मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पर्यटन धोरण जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील विविध हॉटेल्स असाेसिएशन्सनी राज्य सरकारकडे आहे. राज्यकर्ते मागण्या पूर्ण करतील, अशी संघटनांना अपेक्षा आहे. 

या आहेत अपेक्षा- हॉटेल्स व्यवसायाला बूस्ट मिळावा, याकरिता महाराष्ट्रात सर्वसमावेशक पर्यटन धोरण जाहीर करून विविध आकर्षक योजनांची घोषणा करावी. - नवीन हॉटेल सुरू करण्यासाठी परवान्याची गरज नाही. कुणी कुठेही हॉटेल्स सुरू करू शकतो. त्यामुळे हॉटेल व्यवसाय अनियंत्रित झाला आहे. त्यावर नियंत्रणासाठी प्राधिकरण स्थापन करावे आणि या इंडस्ट्रीला कायद्यांतर्गत प्रोत्साहन मिळावे.- २०० कोटींवरील हॉटेल प्रकल्पाला इन्फ्रास्ट्रक्चर दर्जा घोषित आहे, पण त्याला १० कोटींच्या स्लॅबमध्ये आणावे.- हॉटेल क्षेत्राला सन २०२१ मध्ये मिळालेल्या इंडस्ट्रीज दर्जानुसार इंडस्ट्रीजसारखेच वीजदर, पाणी व प्रॉपर्टी कर आणि अन्य सोईसुविधा तात्काळ मिळाव्यात.