शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भयावह घटना टळली; उपमुख्यमंत्री उठून गेले अन् व्हीव्हीआयपी लाऊंजमध्ये शॉर्ट सर्किट झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2023 21:24 IST

Nagpur News महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) ने आयोजित केलेल्या एका भव्य कार्यक्रमात आज सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसून होते, ते मंचावर गेल्याच्या काही मिनिटांनंतरच तेथे शॉर्ट सर्किटमुळे मोठा थरार निर्माण झाला.

नरेश डोंगरे नागपूर : महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) ने आयोजित केलेल्या एका भव्य कार्यक्रमात आज सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसून होते, ते मंचावर गेल्याच्या काही मिनिटांनंतरच तेथे शॉर्ट सर्किटमुळे मोठा थरार निर्माण झाला. वेळीच उपाययोजना करून संभाव्य दुर्घटना रोखण्यात आली. अजनीच्या रेल्वे मेन्स स्कूलजवळ शनिवारी सकाळी महारेलतर्फे आयोजित कार्यक्रमात हा गंभीर प्रकार घडला. यामुळे महारेलच्या अधिकाऱ्यांना चांगलीच धडकी भरली आहे.

महारेलच्या वतिने शनिवारी सकाळी ९ वाजता ठिकठिकाणच्या सहा विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि अजनी रेल्वे पुलासह सहा ठिकाणच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑनलाईन तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी भव्य-दिव्य शामियाना अन् साजेसा मंच उभारण्यात आला होता. पाहुण्यांसाठी मंचाच्या उजव्या बाजूला तात्पुरते व्हीव्हीआयपी लाऊंज तयार करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी आजी-माजी खासदार, आमदारांनी ९ वाजता पासूनच हजेरी लावणे सुरू केले. ९: ३० वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी आले. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यायला उशिर होता. त्यामुळे उपस्थितांना नमस्कार करत करत फडणवीस व्हीव्हीआयपी लाऊंजमध्ये गेले. तेथे ते निवडक सहकाऱ्यांसह बराच वेळ बसले. काही वेळेनंतर गडकरी यांचे आगमन झाल्याने फडणवीस लाऊंजमधून उठून मंचावर गेले. त्याच्या वीसएक मिनिटानंतर (१०:१५ वाजता) व्हीआयपी लाऊंजमधून वेगळाच कडकडाट ऐकू येऊ लागला. 'शॉर्ट सर्किट'मुळे ठिणग्या उडाल्या अन् एकच धावपळ माजली. साधारणत: एक ते दोन मिनिटे ठिणग्यांचा थरथराट सुरू होता. परिणामी तेथे गोंधळ निर्माण झाला. सुरक्षा रक्षक, रेल्वेचे अधिकारी धावले. अग्निशमन उपकरणाचा वापर झाला अन् पुन्हा जैसे थे' स्थिती झाली. तासाभरानंतर कार्यक्रम संपला मात्र एवढ्या चांगल्या कार्यक्रमस्थळी घडलेली ही घटना महारेलच्या अधिकाऱ्यांना धडकी भरविणारी ठरली.

... तर काय गहजब झाला असता ?

उपमुख्यमंत्री फडणवीस ज्यावेळी तेथे बसून होते, त्यावेळी ही घटना घडली असती तर काय गहजब झाला असता असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यावर आता चर्चाही सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, वरकरणी हा प्रकार किरकोळ वाटत असला तरी त्याची गंभीर दखल घेतली गेल्यास कार्यक्रम आयोजनाशी संबंधित असलेल्या काहींना मोठी किंमत चुकवावी लागू शकते, अशीही चर्चा आहे.

टॅग्स :fireआगAccidentअपघात