शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा तडाखा वाढला; तुमच्या प्राण्यांना सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2023 20:02 IST

सध्या उन्हाळा इतका तडकला आहे की प्राण्यांना हिटस्ट्रोक, डिहायड्रेशन होऊ शकते. नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात लोकांकडे विदेशी जातीचे प्राणी आहेत. या प्राण्यांसाठी नागपूरची हिट असह्य आहे.

 

नागपूर : प्राण्यांच्या अंगावर घामाच्या ग्रंथी नसतात. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान घामावाटे कमी होत नाही. तोंडाद्वारे ते हाफतात, शरीराला थंड करण्याचा प्रयत्न करतात. पण सध्या उन्हाळा इतका तडकला आहे की प्राण्यांना हिटस्ट्रोक, डिहायड्रेशन होऊ शकते. नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात लोकांकडे विदेशी जातीचे प्राणी आहेत. या प्राण्यांसाठी नागपूरची हिट असह्य ठरत आहे.

 

काळ्या रंगाच्या प्राण्यांना हिटस्ट्रोकचा जास्त धोका असतो. चपट्या नाकाचा पग, बुलडॉग, पेकीनिज या जातीच्या कुत्र्यांना उष्णता वाढली तर सनस्ट्रोक होतो. लठ्ठ जातीचे कुत्रे लॅब्राडोर, गोल्डन रेट्रीव्हर, रॉट व्हीलर, पिगल हाऊंट, पग, सेन बर्नाड, ग्रेट डेन ही कुत्री उन्हाळ्यात अस्वस्थ होतात. जोरजोरात भूंकतात, जोरात हाफतात. जर्मन शेफर्ड कुत्र्यांना तर ऊन सहन होत नाही.

त्याचबरोबर पर्शियन मांजर, देशी मांजरी, सयामिज, ब्रिटिश शॉर्ट हेअर, हिमालयन कॅट या जातीच्या मांजरीसाठी उन्हाळा घातक असतो. घरी पाळणारे पोपट, लव्हबर्ड, काकाटील, रंगीबेरंगी चिमण्या हिटस्ट्रोकमुळे मरू शकतात.

-सनस्ट्रोक होण्याची कारणे

प्राणी आजारी असेल, खातपीत नसेल, पाण्याचे प्रमाण कमी झाले असेल, इम्युनिटी पॉवर कमी असेल, उन्हात रस्त्यावर फिरविल्याने, अंगावर केस जास्त असले तरी सनस्ट्रोक होऊ शकतो.

 

- लक्षणे

शरीराचे तापमान १०५ डिग्रीवर अचानक जाते, नाकातून तोंडातून रक्तस्त्राव होणे, १०७ च्यावर तापमान गेल्यास गुद्वारातून रक्त येते, कुत्रा धापा टाकतो, तोंडातून लाळ गळतो, जमिनीवर आडवा पडून राहतो, डोळे फिरवितो, उठू शकत नाही.

- प्राण्यांना सावलीत ठेवावे, २४ तास थंड पाणी जवळ ठेवावे. खाण्यात दही भात, दही पोळी, ज्युस फळ, ग्लुकोज इलेक्ट्रॉलचा वापर करावा.  कुल्फी, आइस्क्रीम, आंब्याचे पन व नारळाचे पाणी कुत्रा मांजरांना देता येते. सकाळ संध्याकाळ थंड पाण्याने आंघोळ, सकाळी ७ पर्यंत रात्री ८ नंतरच फिरायला बाहेर काढावे. पाणी जास्त पाजावे.

लोकं ताप उतरविण्यासाठी स्वत:च्या मनाने औषधी देतात, ते देऊ नये त्यामुळे ह्रदयविकाराचा धोका होऊ शकतो.

डॉ. हेमंत जैन, पशुचिकित्सक

टॅग्स :weatherहवामानdogकुत्रा