शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

जि.प.च्या परिचारिका भरतीमध्ये सरकारने उच्च शिक्षितांना डावलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 16:53 IST

कनिष्ठ पदवीधारक पात्र : हायकोर्टाने घेतली गंभीर दखल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने नागपूर व गोंदिया जिल्हा परिषदांतर्गतच्या परिचारिका भरतीमध्ये उच्च शिक्षितांना डावलून केवळ कनिष्ठ पदवीधारकांना नियुक्तीसाठी पात्र ठरविल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची गंभीर दखल घेऊन राज्य सरकार व जिल्हा परिषदांना यावर १९ नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला आहे.

सरकारच्या वादग्रस्त निर्णयाविरूद्ध ३२ उच्च शिक्षित पीडित महिला उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये परिचारिका / महिला आरोग्य सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी २०२३मध्ये जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. दरम्यान, जिल्हा परिषदांनी जनरल नर्सिंग अॅण्ड मिडवायफरी (जीएनएम), बी. एससी. (नर्सिंग) व ऑक्सिलरी नर्सिंग अॅण्ड मिडवायफरी (एएनएम) पदवीधारक असलेल्या आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी झालेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले होते. 

त्या सर्वांची १६ जून २०२४ रोजी परीक्षा झाली व १७ जुलै २०२४ रोजी निकाल जाहीर करण्यात आला. याचिकाकर्ते जीएनएम व बी. एससी. (नर्सिंग) पदवीधारक असून, त्यांना या पदाकरिता पात्र ठरविण्यात आले होते. परंतु यानंतर ग्राम विकास विभागाच्या सचिवांनी ३० सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या पदभरतीकरिता केवळ एएनएम पदवीधारकच पात्र असल्याचे सांगितले. 

त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. परिणामी, जिल्हा परिषदांनी याचिकाकर्त्यांसह इतर जीएनएम व बी. एससी. (नर्सिंग) पदवीधारकांना वगळून केवळ एएनएम पदवीधारकांमधून निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केली. हा निर्णय अवैध असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. 

गुणवत्तेला केराची टोपली दाखविली याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. अमोल चाकोतकर यांनी बाजू मांडताना राज्य सरकारने गुणवत्तेला केराची टोपली दाखविली, असा परखड आरोप केला. जीएनएम व बी. एससी. (नर्सिंग) हे एएनएमपेक्षा उच्चस्तरीय अभ्यासक्रम आहेत. एएनएम अभ्यासक्रम दोन वर्षे, जीएनएम अभ्यासक्रम साडेतीन वर्षे, तर बी. एससी. (नर्सिंग) अभ्यासक्रम चार वर्षे कालावधीचा आहे. जीएनएम व बी. एससी. (नर्सिंग) अभ्यासक्रमात एएनएम अभ्यासक्रमातील सर्व बाबींचा विस्तृतपणे समावेश केला गेला आहे. २०१५मध्ये समान पदे तिन्ही पदवीधारकांमधून भरण्यात आली होती. त्यामुळे जीएनएम व बी. एससी. (नर्सिंग) पदवीधारकांना या पदाकरिता अपात्र ठरविले जाऊ शकत नाही, याकडेही अॅड. चाकोतकर यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय