शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा मे महिन्यात सुरू होणार, नगरविकास मंत्र्यांनी दिले संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2022 17:21 IST

समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी शिंदे वर्धा येथे आले होते.

ठळक मुद्देख्यमंत्र्यांचा आग्रह

नागपूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा हा मे महिन्यात सुरू करण्याचा मानस आहे. तर, दुसरा टप्पा हा डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण केला जाणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.

आज त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. या कामाच्या पाहणीसाठी शिंदे वर्धा येथे आले होते. मे महिन्यात महामार्गाचा पहिला टप्पा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील यांचादेखील तसाच आग्रह असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांच्याकडील मालमत्ता व कथित डायरीप्रकरणी प्रश्न विचारला असता याबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली. तसेच, सध्याच्या परिस्थितीत केंद्रीय तपास यंत्रणांकडून ज्या काही चौकशी सुरू आहे. जे खरोखर असतील, भ्रष्ट असतील त्यांची केंद्रीय यंत्रणांनी जरूर चौकशी करावी. राजकीय सूड भावनेपोटी अशा प्रकारची कारवाई करणे योग्य नाही, लोकशाहीमध्ये हे बरोबर नाही असे शिंदे म्हणाले. 

नेमके काय प्रकरण आहे ?माजी नगरसेवक यशवंत जाधव यांनी कोविडच्या काळात २४ महिन्यांत मुंबई महापालिकेला लुटल्याचा आरोप करण्यात येत आहे. या काळात त्यांनी ३८ मालमत्ता खरेदी केल्या असून, २०१८ ते २०२२ दरम्यानच्या दोन कोटी रुपयांच्या लेनदेणीचा उल्लेख डायरीत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, या डायरीत ५० लाख रुपयांची घडी आणि दोन कोटी रुपये मातोश्रीला देण्यात आल्यासंदर्भात लिहिण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदेYashwant Jadhavयशवंत जाधवraidधाडSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग