शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आईला मारहाण करणाऱ्या बापाचा मुलाने काढला काटा, चाकुने वार करून संपविले

By दयानंद पाईकराव | Updated: September 29, 2023 15:29 IST

संतप्त मुलाचे कृत्य : बजाजनगर पोलिसांनी केली अटक

नागपूर : दारु पिऊन नेहमी आई आणि मुलांना मारहाण करून त्रास देणाऱ्या बापाला पोटच्या गोळ्यानेच चाकुने सपासप वार करून संपविले. ही घटना बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री १० ते गुरुवारी मध्यरात्री १२.२० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी मृतकाचा मोठा मुलगा साहिलला अटक केली आहे.

संजय शंकरराव निधेकर (वय ४५, रा. सुभाषनगर पेट्रोल पंपाच्या मागे) असे खून झालेल्या बापाचे नाव आहे. तर साहिल संजय निधेकर (वय २०) असे आरोपी मुलाचे नाव आहे. मृतक संजयच्या कुटुंबात त्याची पत्नी, २० वर्षाचा मुलगा साहिल आणि एक १९ वर्षाचा मुलगा आहे. संजय पूर्वी फर्निचरचे काम करायचा. परंतु ते काम बंद झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून तो मिळेल ते काम करीत होता. अनेकदा काम न मिळाल्याने तो घरीच राहत होता. त्याची पत्नी धुणीभांडी करते. तर मोठा मुलगा साहिल मजुरी करतो.

संजयला दारुचे व्यसन होते. दारुसाठी तो नेहमीच पत्नीला आणि मुलांना मारहाण करीत होता. मुले, पत्नी बाहेर गेल्यानंतर दारुच्या नशेत तो घराची कडी आतून लाऊन घेत पत्नी, मुलांना बाहेर ठेवत होता. त्याच्या या वागण्यामुळे अनेकदा त्यांचे भांडण होत होते. घटनेच्या वेळीसुद्धा पती-पत्नीचे भांडण झाले. त्यामुळे संजयची पत्नी आपल्या लहान मुलाला घेऊन आईच्या घरी निघून गेली.

काही वेळाने तिने आपल्या लहान मुलाला पतीला पाहण्यासाठी पाठविले. परंतु शेजारी राहणाऱ्या मुलाने त्याचे वडिल अंबाझरी रोडवर विवेकानंद चौक येथे पडून असल्याचे सांगितले. त्यामुळे संजयच्या पत्नी व मुलाने तेथे जाऊन पाहिले असता कोणीतरी तिच्या पतीला मेडिकलला नेल्याचे सांगितले. मेडिकलमध्ये डॉक्टरांनी तपासून संजयला मृत घोषित केले. संजयवर चाकुने वार झाल्याचे पाहून त्याची पत्नी पिंकी निधेकर यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला.

चाकूने वार करून संपविले

मृत संजय नेहमीच कुटुंबीयांना दारू पिऊन त्रास देत होता. पैशांसाठी पत्नीला मारहाण करीत होता. पत्नी पिंकी धुणीभांडी करून मुलांचे पालनपोषण करीत होती. तर मोठा मुलगा साहिलही मजुरी करून घरी हातभार लावायचा. यात संजयच्या वागणुकीमुळे अख्खे कुटुंब त्रस्त झाले होते. घटनेच्या दिवशी सुद्धा संजयने भांडण केल्यामुळे त्याचा मोठा मुलगा साहिल संतापला. रागाच्या भरात त्याने चाकुने वडिलांच्या पाठीवर, डोक्यावर आणि दोन्ही हातावर वार करून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. बजाजनगर पोलिसांनी मृतकाचा मोठा मुलगा साहिलला अटक केली असून त्याने वडिलांचा खून केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास बजाजनगर पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर