फ्लाईंग क्लबच्या प्रशिक्षू विमानाला विभागीय आयुक्तांनी दाखवली हिरवा झेंडी 

By आनंद डेकाटे | Published: June 21, 2023 03:55 PM2023-06-21T15:55:28+5:302023-06-21T15:56:06+5:30

सेसना १७२ आर विमान’ नव्याने सेवेत रुजू

The divisional commissioner flagged off the trainee aircraft of the flying club | फ्लाईंग क्लबच्या प्रशिक्षू विमानाला विभागीय आयुक्तांनी दाखवली हिरवा झेंडी 

फ्लाईंग क्लबच्या प्रशिक्षू विमानाला विभागीय आयुक्तांनी दाखवली हिरवा झेंडी 

googlenewsNext

नागपूर : ‘सेसना १७२ आर’ या प्रशिक्षू विमानास विभागीय आयुक्त तथा नागपूर फ्लाईंग क्लबच्या अध्यक्ष विजयलक्ष्मी बिदरी यांनी बुधवारी हिरवी झेंडी दाखविली. आता हे विमान फ्लाईंग क्लबच्या ताफ्यात प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील फ्लाईंग क्लबच्या हँगरमध्ये आयोजित या कार्यक्रमास उपायुक्त तथा फ्लाईंग क्लबच्या व्यवस्थापकीय संचालक दिपाली मोतीयाळे, उप मुख्य उड्डाण आदेशक कॅ. एस. इझीलारासन उपस्थित होते.

विभागीय आयुक्त बिदरी यांनी ‘सेसना १७२ आर’ विमानाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी फ्लाईंग क्लबच्या हँगरला भेट दिली. त्यांनी येथील प्रशिक्षण केंद्र, विमान दुरुस्ती विभाग आदींची पाहणी केली.

नागपूर फ्लाईंग क्लबमध्ये राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) २० आणि खाजगी २० असे एकूण ४० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षण कालावधीमध्ये नियोजित उड्डाणतास पूर्ण करण्याकरिता फ्लाईंग क्लबच्या ताफ्यात एकूण चार प्रशिक्षू विमान आहेत. यापैकी तीन विमाने ही दोन आसनी आहेत. तर ‘सेसना १७२ आर विमान’ चार आसनी आहे. २०१७ पासून तांत्रिक अडचणीमुळे विमान सेवेत नव्हते. तांत्रिक अडचणी दूर होऊन आजपासून हे विमान फ्लाईंग क्लबच्या सेवेत पुन्हा रुजू झाले आहे.

नागपूर फ्लाईंग क्लब हे राज्य शासनाच्या मालकीचे असून याद्वारे विदर्भ व मध्य भारतातील विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. या क्लबद्वारे परवडणाऱ्या दरात प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात येते. या संधीचा जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन बिदरी यांनी केले आहे.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: The divisional commissioner flagged off the trainee aircraft of the flying club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.