शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ग्रीन जीम साहित्याची किंमत अडीच लाख; खरेदी साडे सहा लाखांची ! 

By गणेश हुड | Updated: November 25, 2023 17:41 IST

जि.प. अध्यक्षांचे देयके थांबविण्याचे आदेश : संयुक्त चौकशी करणार 

नागपूर : खनिज विकास निधीतून जिल्ह्यातील ग्रीम जीमसाठी १३ कोटी रुपये मंजूर झाले. परंतु, गरज नसताना हे ग्रीम जीम लावण्यात आले. समाजकल्याण विभागाने जे  ग्रीन जीमचे साहित्य अडीच लाखांत खरेदी केले. तेच साहित्य बांधकाम विभागामार्फत ६.५० लाखांत खरेदी केले.  यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्यांनी केला.

जिल्ह्यातील रस्ते खराब झाले असून, रस्ते दुरुस्तीसाठी शासन निधी उपलब्ध करून देत नाही. मात्र, ग्रीन जीमवर कोट्यवधीची उधळपट्टी केली जात आहे. मागील जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांनी हा विषय उपस्थित केला होता. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिले होते. परंतु, त्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही.  शुक्रवारी  सभागृहात हा विषय पुन्हा चर्चेला आला. सदस्यांनी ग्रीम जीमवरून सभागृहात चांगलाच संताप व्यक्त केला.

समाजकल्याण विभागाने ग्रीन जीमचे साहित्य अडीच लाखांत खरेदी केले. तेच साहित्य बांधकाम विभागाने ६.५०  लाखांत कसे खरेदी केले? इतकी तफावत कशी? अस सवाल केला. त्यावर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. १३ लाखांत १८५ ग्रीन जीम जिल्ह्यात बसविण्यात आले आहे. उमरेड तालुक्यात  ग्रीन जीम लावायची होते, तिथे लावले नसल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.चौकशीनंतरच देयके द्या

जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरे, दुधराम सव्वालाखे, दिनेश ढोले यांच्यासह इतरही सदस्यांनी ग्रीन जीमचा मुद्दा उपस्थित केला. यावर अध्यक्षांनी  सदस्यांना घेऊन बांधकाम अधिकार्‍यांनी ग्रीन जीमची  चौकशी करण्याचे निर्देश दिले. चौकशी होईपर्यंत कंत्राटदारांची देयके देवू नका, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी सभागृहात दिले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर