शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Winter Session 2022 : अधिवेशनाची ‘दिशा’ भरकटली, दिशा मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 05:28 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नागपूर : सुशांत सिंहची सेक्रेटरी दिशा सालीयनच्या संशयास्पद मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गुरुवारी केली. याप्रकरणी आरोप-प्रत्यारोपांनी अभूतपूर्व गोंधळ झाला. राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांचे निलंबन झाले. यामुळे अधिवेशनाची दिशाच बदलली.

अधिवेशनाला चार दिवस झाले तरी मागासलेले विदर्भ-मराठवाडा आणि राज्यासमोरील प्रश्नांंवर चर्चा आणि निर्णयांची प्रतीक्षाच आहे. सीबीआयने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास केला आहे. दिशा सालीयन मृत्यूचा सीबीआयने तपास केला नसल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. दिशा मृत्यूची चौकशी करावी, ही मागणी करत सत्ताधारी आमदारांनी प्रचंड गदारोळ घातला. 

मुख्यमंत्री झाले संतप्तजयंत पाटील यांनी अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरले तेव्हा सभागृहात असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिशय संतप्त झाले. अध्यक्षांच्या दालनात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. पाटील माफी मागतील, आता विषय संपवा असे विरोधकांनी म्हटले; पण मुख्यमंत्री ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नव्हती. म्हणूनच मी ‘असा निर्लज्जपणा करू नका’ असे सरकारला उद्देशून म्हणालो. जयंत पाटील

अध्यक्षांबद्दल अपशब्द, जयंत पाटील निलंबित 

  • राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे विधिमंडळातील नेते जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांना विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. तोवर त्यांना नागपूर आणि मुंबईतील विधानभवन परिसरात येण्यासही मनाई असेल.
  • दिशा मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार हे बोलत असतानाच शिवसेनेचे भास्कर जाधवही बोलू इच्छित होते. उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे, असे म्हणत अध्यक्ष नार्वेकर यांनी पुढचे कामकाज पुकारले. 
  • त्याचवेळी जयंत पाटील उभे राहिले आणि त्यांनी अध्यक्षांबाबत अपशब्द वापरला. अत्यावर सत्तारुढ सदस्य अत्यंत आक्रमक झाले. कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. 

खासदाराच्या चौकशीसाठी एसआयटी नेमामुंबईच्या चेंबूर परिसरातील खासदाराविरोधात पोलिसात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल झाल्याचा मुद्दा परिषदेत गाजला. याप्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित खासदाराची एसआयटी चौकशीचे व अधिवेशन संपण्यापूर्वी घोषणा करण्याचे निर्देश दिले. दिशा प्रकरणाची चौकशी करत असाल मग पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातही चौकशी करावी.अजित पवार

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनJayant Patilजयंत पाटील