शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटल्याने कार उलटली; आईचा मृत्यू; मुलगा, सून जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2023 21:24 IST

Nagpur News लग्नसमारंभ आटाेपून परत येत असलेल्या कारचा मागचा डावा टायर फुटला आणि वेगात असलेली कार अनियंत्रित हाेऊन राेडवर उलटली. यात वृद्ध आईचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा आणि सून दाेघे गंभीर जखमी झाले.

नागपूर : लग्नसमारंभ आटाेपून परत येत असलेल्या कारचा मागचा डावा टायर फुटला आणि वेगात असलेली कार अनियंत्रित हाेऊन राेडवर उलटली. यात वृद्ध आईचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा आणि सून दाेघे गंभीर जखमी झाले. कार चालक मात्र थाेडक्यात बचावला. ही घटना चिमूर-उमरेड राेडवरील उमरी फाटा परिसरात साेमवारी (दि. २९) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.

सत्यभामा बाळकृष्ण झिलपे (७५) असे मृत आईचे नाव असून, गंभीर जखमींमध्ये मुलगा भोजराज बाळकृष्ण झिलपे (५२) व सून सुनीता भोजराज झिलपे (४८) या दाेघांचा समावेश आहे. हे तिघेही कुही शहरातील रहिवासी आहेत. ते पिंपळनेरी, ता.चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथील राजूरकर परिवारातील लग्नसमारंभात सहभागी हाेण्यासाठी चिमूरला गेले हाेते. लग्न आटाेपल्यानंतर तिघेही एमएच-४०/सीएच-३४४६ क्रमांकाच्या कारने चिमूरहून उमरेडे मार्गे कुहीला यायला निघाले.

ते पिंपळनेरी नजीकच्या उमरी फाटा परिसरात येताच, त्यांच्या कारचा डाव्या भागाचा मागचा टायर फुटला आणि वेगात असलेली कार अनियंत्रित झाली. या कारने राेडवर दाेन काेलांट्या घेतल्याने, कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले. त्यातच काही वेळातच सत्यभामा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच, चिमूर पाेलिसांनी घटनास्थळ गाठून सत्यभामा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी, तर भाेजराज व सुनीता यांना उपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. कार चालकाला मात्र फारशी दुखापत झाली नाही. या प्रकरणी चिमूर पाेलिसांनी नाेंद केली असून, तपास पोलिस निरीक्षक मनोज गभणे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू