शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

कारमध्ये आत्महत्या करणाऱ्या 'त्या' उद्योजकाच्या पत्नीचेही निधन, मुलाची प्रकृती स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2022 15:00 IST

व्यावसायिक भट यांच्याविरोधात हत्या व हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

नागपूर : आर्थिक विवंचनेमुळे उद्योजक रामराज भट यांनी कारमध्येच स्वत:लाच जाळून घेतल्याच्या घटनेला पाच दिवस झाल्यानंतर त्यांच्या पत्नी संगीता यांचेदेखील निधन झाले. यात जखमी झालेला त्यांचा मुलगा नंदन याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणात बेलतरोडी पोलिसांनी अगोदर अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता; मात्र संगीता यांच्या निधनानंतर भट यांच्याविरोधात हत्या व हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामराज भट यांचे नट-बोल्ट उत्पादनाचे काम होते. कोरोनामुळे त्यांच्या व्यवसायाला प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे भट आर्थिक कोंडीला सामोरे जात होते. आर्थिक विवंचनेतून भट यांनी कुटुंबीयांनाच संपविण्याचा निर्णय घेतला. १९ जुलै रोजी वर्धा मार्गावरील एका पॉश हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने ते पत्नी व मुलाला घेऊन कारमधून निघाले. जवळपास एकच्या सुमारास खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवून भट यांनी पत्नी व मुलाला पिण्यासाठी विष दिले. दोघांनाही संशय आल्याने भट यांनी हे ॲसिडिटीचे औषध असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. औषधाचा रंग काळा असल्याने मुलाने ते घेण्यास नकार दिला. यानंतर भट यांनी त्यांच्याजवळील बाटलीतील द्रवपदार्थ तिघांवरही फवारला आणि पत्नी व मुलाला काही समजण्यापूर्वीच त्यांनी कार पेटवून दिली. यात तिघेही भाजले; परंतु आई व मुलगा जखमी झाले. तर वडिलांचा मात्र मृत्यू झाला. त्यांच्या सुसाइड नोटवरून कारणाचा खुलासा झाला.

संगीता या हल्ल्यात ६० टक्क्यांहून अधिक भाजल्या होत्या. त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू होते; परंतु रविवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा नंदन याची प्रकृती स्थिर आहे. पाच दिवसांच्या अंतराने वडील व आई गमाविल्याने त्याला मोठा धक्का बसला आहे.

नंदनचा अखेर जबाब, वडिलांनीच आग लावल्याची स्पष्टोक्ती

भट यांची पत्नी व मुलगा यांच्यावर उपचार सुरू असल्याने त्यांचे बयाण घेणे पोलिसांना शक्य झाले नव्हते. संगीता यांचा मृत्यू झाल्याने नंदनच्या बयाणावरच अनेक गोष्टी अवलंबून होत्या. बेलतरोडी पोलिसांनी अखेर त्याचे बयाण घेतले. वडील असे काही पाऊल उचलतील याची काहीच कल्पना नव्हती, असे त्याने सांगितले. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा त्याने व त्याच्या आईने अक्षरश: रस्त्यावर लोळून त्यांना लागलेली आग विझविली होती; परंतु वडिलांचा डोळ्यासमोर मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू