शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी रकमेचा

By गणेश हुड | Updated: January 12, 2024 18:41 IST

बांधकाम, आरोग्यासह सामान्य प्रशासन विभागाला लागणार कट

नागपूर : मुद्रांक शुल्काची थकबाकी व राज्य शासनाकडून अप्राप्त अनुदान याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या  वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पावर होणार आहे.  परिणामी मागील वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्प कमी रकमेचा राहणार असून तो ३९ कोटींच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी वित्त समितीच्या बैठकीत सभापती राजकुमार कुसुंबे यांनी अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून आढावा घेण्यात आला.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता सत्ताधाऱ्यांकडून अर्थसंकल्प जानेवारी अखेरीस सादर करण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी  सुरू केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौम्या शर्मा यांनी यासंदर्भात नुकताच आढावा घेतला. विविध विभागांकडून करण्यात आलेल्या मागणीची माहिती त्यांनी घेतली. 

वर्ष २०२३-२४ साठी ४० कोटी ६९ लाखांचा अर्थसंकल्प कुसुंबे यांनी सादर केला होता. मागील वर्षाच्या तुलनेत अर्थसंकल्प १० ते १५ टक्के वाढीचा असतो. परंतु अद्याप शासनाकडून अनुदानाची अपेक्षित रक्कम प्राप्त झालेली नाही. त्यामुळे वर्ष २०२३-२४ च्या सुधारित अर्थसंकल्पात विविध विभागांच्या तरतुदींना कट लागणार आहे. शासनाकडून साधारणतः अनुदानाची रक्कम मार्च अखेरीस येते. यंदाचे निवडणुकीचे वर्ष असून येथे राज्य सरकारच्या विरोधातील सत्ता आहे, त्यामुळे शासनाकडून निधीही कमी मिळण्याचा अंदाज सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला आहे. याचा विचार करता बांधकाम, आरोग्यासह सामान्य प्रशासन विभागांच्या तरतुदींना कट लावावा लागणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदBudgetअर्थसंकल्प 2023