शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दिरंगाईच्या घोड्यांनीच पिले गोसीखुर्दच्या सिंचनाचे पाणी!

By निशांत वानखेडे | Updated: August 28, 2023 10:48 IST

३० हजार कोटींवर गेला ३७२ कोटींचा प्रकल्प

निशांत वानखेडे

नागपूर : एखादा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला तर जनतेला त्याचा लाभ मिळतो; पण रखडला तर त्याचा भुर्दंडही जनतेलाच भोगावा लागतो. गोसीखुर्द प्रकल्पाला १९८३ साली प्रशासकीय मान्यता मिळाली व ऑक्टोबर १९८४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाया रचला. २२ एप्रिल १९८८ रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी प्रत्यक्ष कामाचे भूमिपूजन केले. तेव्हापासून सरकारी अनास्था, प्रशासकीय चालढकल करीत प्रकल्पाचे काम सुरू असून या प्रकल्पामुळे विस्थापित झालेली एक पिढी गतप्राण झाली तरी प्रकल्प काही पूर्ण होत नाही.

प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेले धरणाचे बांधकाम तेवढे २००८ मध्ये पूर्ण झाले. डावा कालवा, उजवा कालव्यांची पुनबांधणी, अस्तरीकरणाची कामे, शाखा कालवे, उपकालवे, शेतापर्यंत पाणी पोहोचविणाऱ्या वितरिकांची कामेही अपूर्ण आहेत. आतापर्यंत १ लाख ५२ हजार ७४३ हेक्टर शेती सिंचनाखाली आल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक परिस्थिती याहून वेगळी आहे. आता जून २०२५ पर्यंत हा प्रकल्प १०० टक्के पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. मात्र, सरकारकडून मिळणारा निधी पाहता हेही दिवास्वप्नच वाटते आहे.

भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील अडीच लाख हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचेही तेच झाले आहे. ३५ वर्षांपासून रेंगाळलेल्या या प्रकल्पाचा बजेट ३७२ कोटींवरून आता ३० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकवर गेला आहे. धरण पूर्ण झाले असे म्हणता प येते; पण सिंचनाचा लाभ काही लोकांपर्यंत पोहोचला नाही.

प्रकल्पाचे स्वरूप

  • वैनगंगा नदीवरील मुख्य धरण ६५३ मीटर लांब, ९२ मीटर उंच.
  • भंडारा जिल्हा १०४ व नागपूर जिल्ह्यात ८५ गावांचे विस्थापन. २४९ गावांचे पुनर्वसन.
  • सिंचन क्षमता २ लाख ५० हजार ८०० हेक्टर. यात भंडारा जिल्हा ८९,८५६ हेक्टर. नागपूर १९,४८१ हेक्टर व चंद्रपूर जिल्हा १ लाख ४१ हजार ४६३ हेक्टर.
  • डावा कालवा २३ किमी. उजवा कालवा ९९.५३ किमी.
  • डावा कालवा: पवनी ४६ व लाखांदूर तालुक्यात ४४ अशा ९० गावांत ३१,५७७ हेक्टरचे सिंचन

 

१.६० कोटी खर्च दररोज वाढला

  • गोसीखुर्द प्रकल्प हा १९८३ साली ३७२ कोटी रुपयांचा होता २०१३-१४ च्या प्रस्तावित किमतीनुसार त्यावर १८,११०.०८ कोटी इतका खर्च दाखविण्यात आला.
  • आता २०२३ पर्यंत हा खर्च ३० हजार कोटींवर गेल्याचे सांगण्यात •येत आहे. हा खर्च पाहता गोसी खुर्द प्रकल्पाचा खर्च दरदिवशी १ कोटी ६० लाख रुपये इतका वाढला आहे.

 

प्रकल्पातून सिंचन स्थिती

  • डावा कालवा २३ किमी - अस्तरीकरण व पुनबांधणीचे काम ७५ टक्के पूर्ण. शाखा कालवे १०० टक्के पूर्ण.
  • वितरिका ७१.४५ किमी व लघू कालवे २२५,६० किमी ७५ टक्के पूर्ण.
  • ४५,३३६ हेक्टर सिंचन क्षमता. एप्रिल २०२३ पर्यंत ३१,५४६ हेक्टर झाल्याचा दावा, १४,०३३ हेक्टर प्रत्यक्ष सिंचन.
  • उजवा कालवा : ६४,३६२ हेक्टर सिंचन क्षमता. अस्तरीकरण व पुर्नबांधणी ८० टक्के पूर्ण, १ ते ३० किमीतील वितरिका ८० टक्के पूर्ण, ३१ ते ९९.५३ किमीतील वितरिकांची कामे ५० टक्के अपूर्ण. सिंचन क्षमता ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पWaterपाणीbhandara-acभंडारा