शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन खरेदी मुदतवाढीचे घोंगडे भिजतच, मंत्र्यांनी घोषणा केली, पण आदेशच नाहीत!

By सुनील चरपे | Updated: January 13, 2025 10:41 IST

बारदान्याअभावी राज्यातील नाफेडच्या बहुतांश केंद्रावरील साेयाबीन खरेदी बंद आहे. हा तिढा साेडविण्यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबई येथे विशेष बैठक पार पडली.

नागपूर : राज्यात नाफेड व एनसीसीएफद्वारे एमएसपी दराने केल्या जाणाऱ्या साेयाबीन खरेदीची मुदत रविवारी (दि.१२) संपली आहे. या खरेदीला मुदतवाढ देण्याची घाेषणा पणनमंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी (दि. ८) केली. मात्र, नाफेड, एनसीसीएफ व पणनच्या अधिकाऱ्यांना या मुदतवाढीचे ताेंडी अथवा लेखी आदेश रविवारी रात्रीपर्यंत प्राप्त झाले नव्हते. यासंदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती पणनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

बारदान्याअभावी राज्यातील नाफेडच्या बहुतांश केंद्रावरील साेयाबीन खरेदी बंद आहे. हा तिढा साेडविण्यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबई येथे विशेष बैठक पार पडली. या बैठकीत साेयाबीन खरेदीच्या सात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. साेयाबीन खरेदी मुदतवाढीचा या बैठकीच्या इतिवृत्तात उल्लेख नाही. बैठकीत साेयाबीन खरेदी मुदतवाढीवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी प्राप्त हाेताच, मुदतवाढीची पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती पणनच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे साेयाबीन खरेदीवर सध्यातरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मंजुरीसाठी आणखी किती दिवस ?- नाफेड व एनसीसीएफ या दाेन्ही संस्था केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्य करतात. - राज्य सरकारच्या पणन मंत्रालयाने केंद्राकडे गुरुवारी (दि. ९) साेयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर केला. चार दिवस पूर्ण हाेऊनही केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही.

३१ जानेवारीपर्यंतचा प्रस्तावसाेयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मुदतवाढ मागितली जाईल, असेही पणनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Soybeanसोयाबीन