शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

भिक्खू संघाने धम्माचा प्रचार प्रसार करावा

By आनंद डेकाटे | Updated: May 25, 2024 18:44 IST

भदंत सुरेई ससाई : दीक्षाभूमीवर तीन दिवसीय बुद्ध महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भिक्खू संघाचे मुख्य कार्य धम्माचा प्रचार प्रसार करणे आहे. मात्र, भिक्खू संघ परित्राणपाठ आणि लग्नसमारंभ कार्यात व्यस्त दिसतो. त्यामुळे धम्माच्या कार्याला गती मिळत नाही. भिक्खू संघाने एकत्रित येवून धम्माचा प्रचार प्रसार करावा. धम्माचे कार्य गतिमान करावे, असे आवाहन परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले.

प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी येथे आयोजित तीन दिवसीय बुद्ध महोत्सवात भदंत ससाई अध्यक्षस्थानाहून बोलत होते. कार्यक्रमाला बुद्धिस्ट सेमिनरीचे प्रमुख भंते धम्मसारथी, भंते नागवंश, भंते नागसेन, भंते धम्मविजय, भंते धम्मविजय उपस्थित होते.

बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे बौध्द बांधवांनी वाचन करावे, असे आवाहन भंते नागवंश यांनी केले. बौध्द बांधवांच्या घरी बुद्ध आणि आंबेडकरी साहित्य मोठया प्रमाणात आहेत. सामान्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रंथांची गरजही नाही. सामान्यांनी केवळ बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन केल्यास धम्म सहज कळेल. या ग्रंथात बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनातील महत्वाच्या तीन घटनांचा म्हणजे जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण याचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. याशिवाय राजा शुध्दोधन आणि महामाया यांच्या विषयीची दुर्मिळ माहिती आहे. धम्माविषयी सखोल माहिती घेण्यासाठी या पवित्र ग्रंथाचे वाचन करावे, असेही ते म्हणाले. यावेळी भंते नागसेन, भंते धम्मविजय, भंते अश्वजित यांनीही धम्माविषयी सखोल मार्गदर्शन केले. संचालन आणि आभार भंते धम्मविजय यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर