शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कळमन्यात बैगनपल्लीसह ‘हापूस’ची आवक वाढली

By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 12, 2024 19:54 IST

- ६०० ते ८०० रुपये डझन : किरकोळमध्येही दर घटले, बैगनपल्लीची ८० टक्के विक्री

नागपूर : आंब्याला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे यावर्षी आंब्याच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. परिणामी, नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न समितीच्या फळ बाजारात आवक वाढल्याने भाव घसरले आहेत. सर्वाधिक विक्रीच्या बैगनपल्ली आंब्याचे १२५ ट्रक दरदिवशी विक्रीसाठी येत आहेत. भाव दर्जानुसार ३० ते ४५ रुपये किलो आहे. मात्र, किरकोळमध्ये दुप्पट, तिप्पट भावात विक्री होत आहे. 

मध्यंतरी आलेल्या पावसामुळे आंब्याची चव आणि दर्जा उत्तम नाही. दुसरीकडे उत्पादन वाढल्याने माल विक्रीसाठी जास्त प्रमाणात येत आहे. भाव गेल्यावर्षीप्रमाणेच आहेत. यंदा आवक ३० जूनपर्यंत राहील, मात्र १५ जूननंतर कमी होईल. आंध्रप्रदेश आणि तेलंगाना राज्यातून बैगनपल्ली आंब्याचे ५ ते ७ टन क्षमतेचे ११० ते १२५ ट्रक विक्रीसाठी येत आहेत. 

मुंबईतून येताहेत हापूसचे ३०० डब्बेकळमन्यात रत्नागिरीच्या हापूस आंब्याची आवक वाढली आहे. मुंबईहून डझन पॅकिंगचे दररोज ३०० डब्बे येत असून ६०० ते ८०० रुपये डझन भाव आहे. दुसरीकडे आंध्रप्रदेशाच्या हापूस आंब्याच्या २०० क्रेट (प्रति क्रेट २० किलो) येत असून ८० ते १०० रुपये भाव आहे. हा आंबा चवीला गोड आहे.

लंगडा, दशेरी, तोतापल्ली, केशरची विक्री वाढली

कळमन्यात स्थानिक उत्पादकांकडून लंगडा, दशेरी आणि केशर आंबे विक्रीला येत आहेत. भिवापूर, मांढळ, कोहमारा, गोंदिया, मौदा या भागातून लंगडा आंब्याचे ३० ते ४० टेम्पो (प्रति टेम्पो १ टन) विक्रीसाठी येत असून भाव दर्जानुसार प्रति किलो ३० ते ६० रुपयांवर आहेत. दशेरी नागपूर जिल्ह्याच्या विविध भागातून कळमन्यात येत आहे. या आंब्याचेही भाव ३० ते ६० रुपये किलो आहे. शिवाय स्थानिकांकडून केशर आंब्याच्या २०० क्रेट (प्रति क्रेट २० किलो) दररोज येत आहेत. ५० ते ६० रुपये भाव आहे. तसेच गुजरात राज्यातून केशर आंब्याचे १० किलो पॅकिंगचे ३०० बॉक्स विक्रीला येत असून भाव ७० ते ९० रुपयांदरम्यान आहेत. आंध्रदेशच्या तोतापल्ली आंब्याचे भाव दर्जानुसार २५ ते ३० रुपये किलो आहेत. नीलम आंब्याची आवक पावसाळयात होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.कळमना फळे अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, मतमोजणीच्या काळात कळमन्यातील फळ बाजारावर अतिक्रमण नकोच. या बाजारातील लिलावाचे हॉल क्र. ३, ४, ५ प्रशासनाने मतमोजणीसाठी ताब्यात घेतले आहेत. २० मेनंतर व्यापाऱ्यांना प्रवेश मिळणार नाही. व्यापाऱ्यांच्या सुविधेसाठी प्रशासनाने फळांच्या लिलावासाठी रस्त्यावर मंडप टाकले आहेत. प्रशासनाने मतमोजणी  शहराबाहेर वा मानकापूर येथील इंडोअर स्टेडियममध्ये घ्यावी.

सर्वाधिक बैगनपल्लीची विक्रीकळमना बाजारात अनेक वर्षांपासून बैगनपल्ली आंब्याला सर्वाधिक मागणी असते. त्या खालोखाल केशर, लंगडा, दशेरी, गावरान आंब्याची विक्री होते. रत्नागिरीचा हापूस महाग असल्याने त्याचे ग्राहकही कमी आहेत. गुजरातचा केशर आणि आंध्रप्रदेशच्या हापूस आंब्याची चांगली मागणी आहे. १५ जूनपर्यंत आवक राहील.आनंद डोंगरे, अध्यक्ष, कळमना फळे अडतिया असोसिएशन.

 

 

 

टॅग्स :Mangoआंबाnagpurनागपूर