शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘कृषी अवजारे पुरवठा’ घोटाळा थंडबस्त्यातच

By आनंद डेकाटे | Updated: July 8, 2024 19:19 IST

Nagpur : समाजकल्याण विभाग कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करतोय?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजकल्याण विभागामार्फत महिला बचत गटांना कृषी अवजारे संच पुरवठा करण्यात आला होता. कृषी अवजारे बचत गटांच्या खात्यातून रक्कमही उचलण्यात आली होती. सदर प्रकरण चव्हाट्यावर येताच मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी चौकशी करण्याचे सूतोवाच करण्यात आले होते; परंतु सध्या तरी या प्रकरणाची सखोल चौकशीच थंडबस्त्यात आहे. त्यामुळे विभाग या प्रकरणात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

समाजकल्याण विभागामार्फत २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील १०० महिला बचतगटांना कृषी अवजारे देण्याची योजना आखली. यासाठी खनिज प्रतिष्ठानमधून ८ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर झाला. प्रत्येक महिला बचतगटाला ८ लाख ७१ हजारांचे साहित्य देण्यात येणार होते. सर्व तालुक्यांतील महिला बचत गटांची यासाठी निवड करण्यात आली; परंतु उमरेड तालुक्यातील महिला बचत गटांना साहित्य मिळालेच नाही. याबाबतची तक्रार महिला बचत गटाने विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली. त्यांनी संबंधित तक्रार समाजकल्याण विभागाकडे वर्ग केली.

मिळालेल्या माहितीनुसार, साहित्य पुरवठा करण्याचे काम साई या कंपनीला देण्यात आले होते. हे साहित्य ९० टक्के अनुदानावर देण्यात आले. १० टक्के रक्कम भरल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात टाकण्यात आली. समाजकल्याण विभागाकडून करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात आल्यानंतर ती लगेच काढण्यात आल्याची माहिती समोर आली. पुरवठादाराकडून काही साहित्य बचत गटांना देण्यात आले; परंतु ते नादुरुस्त असल्याचे कारण पुढे करीत परत नेले. १० टक्के रक्कम त्रयस्थ व्यक्तीकडून भरण्यात आल्याची बाबही तपासात समोर आली. काही महिला बचत गटांचे प्रमाणपत्र संशयास्पद आहेत. काही प्रमाणपत्रांवर मागील एक-दोन वर्षांपूर्वीची तारीख आहे.

त्यामुळे बचत गट बोगस तयार करण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. दोन ते तीन तालुक्यांच्या चौकशीतच ही बाब समोर आली. सर्व जिल्हाभर हा प्रकार झाल्याचा अंदाज आहे. गत काही महिन्यांपासून चौकशी थंडबस्त्यात असल्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :nagpurनागपूर