शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे वृद्ध वडिलांनीही सोडला प्राण; एकाच वेळी अंत्यसंस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2023 22:26 IST

Nagpur News मुलाचे निधन झाल्यामुळे त्याचा जबर धक्का बसलेल्या ९० वर्षांच्या वडिलांनीही जीव सोडला. ही घटना शनिवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास नरेंद्रनगर येथील श्रीनगरमध्ये घडली.

नागपूर : मुलाचे निधन झाल्यामुळे त्याचा जबर धक्का बसलेल्या ९० वर्षांच्या वडिलांनीही जीव सोडला. ही घटना शनिवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास नरेंद्रनगर येथील श्रीनगरमध्ये घडली. वडील आणि मुलावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्यामुळे नातेवाइकांसह परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

संदीप धर्मराज कटारमल (५२, श्रीनगर, नरेंद्रनगर) यांचे शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांची ट्रॅव्हल्स एजन्सी होती. संदीप यांच्या निधनामुळे कटारमल कुटुंबीयांवर शोककळा पसरली. मुलाच्या निधनामुळे संदीप यांचे वडील धर्मराज (९०) यांना जबर धक्का बसला. मुलाऐवजी आपल्यावर काळाने झडप घालायला हवी होती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, शनिवारी सकाळी सात वाजता मुलाच्या विरहात धर्मराज यांची प्रकृती बिघडली. यात त्यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबात वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्यामुळे जमलेले नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. शनिवारी सकाळी ११ वाजता मानेवाडा घाटावर मुलगा संदीप आणि वडील धर्मराज यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

.............

टॅग्स :Deathमृत्यू